mp dhananjay mahadik Meet his uncle mahdev mahadik in shiroli after win in rajya sabha election  
कोल्हापूर

महाडिक कुटुंबियांचा भावनिक क्षण, काकांच्या भेटीनंतर अश्रू अनावर

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : नुकतेच झालेल्या राज्यसभेच्या निवडणूकीत कोल्हापूरचे भाजप उमेदवार धनंजय महाजिक यांनी विजय मिळवला आहे, या विजयानंतर आज त्यांचे कोल्हापूरात जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी खासदार महाडिक यांच्या स्वागतासाठी संपूर्ण महाडिक कुटुंबिय एकत्र आले होते. (mp dhananjay mahadik Meet his uncle mahdev mahadik in shiroli after win in rajya sabha election)

दरम्यान राज्यसभा निवडणूक जिंकल्यानंतर आज खासदार धनंजय महाडिक कोल्हापूरला परतले. तेव्हा सर्वप्रथम शिरोली येथे जाऊन त्यांनी काका महादेवराव महाडिक यांची भेट घेतली. यावेळी धनंजय महाडिक यांना अश्रू अनावर झाले. हा क्षण संपूर्ण महाडिक कुटुंब आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी अतिशय भावनिक असा होता.

दरम्यान आज धनंजय महाडिक पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, पुरेसं संख्याबळ असल्यानेच मला उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे घोडेबाजार करण्याचा मुद्दा येत नाहीत. आमदार काही विकावू नाहीत. राज्यसभेला गुप्त मतदान पद्धत नसतानाही भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. विधानपरिषद निवडणुकीवरूनही महाविकास आघाडी सरकारला जाहीर इशारा दिला.

पुढे बोलताना ते म्हणाले संघर्ष महाडिकांच्या पाचवीलाच पुजला आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार 2019 मध्ये अस्तित्वात आलं असलं, तरी हे तिन्ही पक्ष महाडिकांविरुद्ध कोल्हापूर लढल्याचे त्यांनी सांगितले. कोल्हापूरमध्ये भाजपचा एकही आमदार खासदार नाही, महापालिकेत सत्ता नाही, जिल्हा परिषदेत सत्ता होती, पण ती आता नाही. महाडिकांचा दबदबा कालही होता, आजही आहे आणि पुढील 100 वर्ष राहिल असे सांगत त्यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना एकप्रकारे जाहीर इशारा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा स्पष्ट झाली आहे, असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT