MP Mane Said, "We Will Strengthen Ichalkaranji's Schools On The Lines Of Delhi." Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

इचलकरंजीच्या शाळांचे दिल्लीच्या धर्तीवर बळकटीकरण : खासदार माने

पंडित कोंडेकर

इचलकरंजी : दिल्लीच्या धर्तीवर इचलकरंजी पालिकेच्या प्राथमिक शाळांचे स्वरुप बदलण्यात येणार आहे. येथे नजीकच्या काळात दर्जेदार शिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे शिक्षणाचा नवा इचलकरंजी पॅटर्न तयार होईल. या उपक्रमासाठी आवश्‍यक तितका निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही खासदार धैर्यशील माने यांनी दिली. 

येथील पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार उद्‌घाटन कार्यक्रमासाठी आज खासदार माने आले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. इचलकरंजी महापालिका करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच याबाबत सर्वपक्षीय बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

ते म्हणाले, "इचलकरंजी पालिकेच्या 47 प्राथमिक शाळा आहेत. यामध्ये 7402 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 295 शिक्षक ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. प्रतिकूल परिस्थीतीत या शाळांमध्ये अनेक विद्यार्थी ज्ञान घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात भरारी घेतली आहे. आता सर्व सामान्य कामगार वर्गातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी दिल्लीच्या धर्तीवर या शाळांच्या बळकटीकरणावर भर देण्यात येणार आहे.' 

लोकसंख्येचा विचार करता इचलकरंजी महापालिका होणे सुलभ झाले आहे. लवकरच याबाबत एक सर्व पक्षीय व्यापक बैठक घेण्यात येणार आहे. यामध्ये महापालिका करण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, असे श्री. माने यांनी स्पष्ट केले. उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, नगरसेवक रवींद्र माने आदी उपस्थित होते. 

मसोबा देवस्थान परिसर 
विकसित करण्याचा प्रस्ताव 

शहापूर येथील मसोबा देवस्थान परिसर विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेने सुमारे पाच कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. पालिका सभेतील मंजुरीनंतर तो राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी प्रयत्न करण्यात येतील, असे खासदार माने यांनी सांगितले. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water: उन्हाळ्यापूर्वीच मुंबईकरांवर पाणीसंकट! सातही धरणांतील साठ्यात घसरण; 'या' दिवसापासून पाणीकपात जारी

स्वस्त हॉटेल, कमी बजेट आणि इंटीमसीचा भडीमार, कुठे आणि कसा शूट होतो बी-ग्रेड सिनेमा?

Panand Road Scheme : अक्षय तृतीयेला पाणंद रस्ते योजनेचा प्रारंभ, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

Nashik sex scandal: खरातनंतर नवं सेक्स स्कँडल! चोरी गेलेला टॅब ठरला संकट, २०० व्हिडिओंनी उघड केलं मोठं रहस्य, तक्रारदारच अडकला

Pune Ring Road Work Accident : पुण्यात रिंग रोडच्या कामावेळी तरुणाचा बुडून मृत्यू, शिडीवर चढताना पाय घसरला अन्, ४० फूट नदीपात्रात कोसळला

SCROLL FOR NEXT