sambhajiraje sakal
कोल्हापूर

मराठा आरक्षणप्रश्‍नी खासदार संभाजीराजे घेणार राष्ट्रपतींची भेट

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : मराठा आरक्षणप्रश्‍नी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची दोन सप्टेंबरला भेट घेणार असून, सर्व पक्षांना त्यांचे प्रतिनिधी पाठविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाचा विषय राष्ट्रपतींकडे मांडण्यासाठी व समाजाच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी राष्ट्रपती भवनकडे पत्रव्यवहार करून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भेटीची वेळ मागितली होती. त्यानुसार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी २ सप्टेंबरला भेटीची वेळ दिली असल्याची माहिती संभाजीराजे यांनी ट्विटरवर दिली आहे.

राष्ट्रपतींच्या भेटीसाठी महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षाने त्यांचा एक खासदार प्रतिनिधी पाठवावा. यासाठी सर्व पक्षांच्या प्रमुखांना व गटनेत्यांना पत्र पाठवून आवाहन केल्याची माहिती त्यांनी दिली आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या दृष्टीने ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, यावेळी महाराष्ट्रातील सर्व पक्ष खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत आपले प्रतिनिधी म्हणून कोणास पाठवतात, याकडे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP आंदोलनातील धरपकडीची संयुक्त राष्ट्रांकडून दखल; आंदोलकांना ताब्यात घेतल्याबद्दल चिंता व्यक्त, भारताचे प्रत्युत्तर!

Jayasri Burman Paintings : जयश्री बर्मन यांच्या चित्रांत पुराणकथा आणि निसर्गाचे अनोखे विश्व

Crime News: कड्यावरून ढकलून प्रेयसीचा केली हत्या;लग्न ठरल्यामुळे भेटण्यास टाळाटाळ केल्याने कृत्य

RICH ZODIAC SIGNS 2027: २०२७ मध्ये ‘या’ राशींचं नशीब चमकणार! मेहनतीला मिळेल भाग्याची साथ, अचानक होऊ शकतो मोठा धनलाभ

Maharashtra Weather Update : मॉन्सूनची महाराष्ट्रातून माघार, तापमानाचा पारा ३९ अंशांपार, ६ जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT