MSEDCL Bill Inspection Repair Campaign; Penalties for agricultural pump bills, interest will be waived 
कोल्हापूर

महावितरणतर्फे बिल तपासणी दुरुस्ती मोहीम ; कृषी पंप बिलांचे दंड, व्याज होणार माफ 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर :  राज्यातील कृषी पंपांना मिळणारी मर्यादित वीज तसेच बिलांची वाढती थकबाकी यावर उपाय म्हणून जुन्या वीज बिलांची दुरुस्ती मोहीम राबविण्यात येणार आहे. त्याद्वारे दंड व व्याज माफ करण्यात येईल. कृषी पंपधारक शेतकऱ्यांना केवळ मूळ थकबाकी भरावी लागणार आहे. 
राज्याच्या ऊर्जा विभागांना कृषी धोरण 2020 तयार केले आहे. त्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली. राज्यातील कृषी पंपांना नवीन वीज जोडणी देण्यात येणार आहे. लघुदाब, उच्चदाब, सौर यंत्राद्वारे पंपांना वीज जोडली जाणार आहे. वीज खांबापासून 200 मीटरपर्यंत लघुदाब जोडणी, तर 200 ते 600 मीटरपर्यंत उच्चदाब वितरण प्रणालीव्दारे, तर 600 मीटरपेक्षा अधिक अंतरावरील कृषी पंपाची वीज जोडणी सौर पंपाव्दारे होणार आहे. समर्पित वितरण सेवेनुसार कृषी पंपाच्या नव्या वीज जोडणीचा खर्च वीज ग्राहकांनी स्वतः केल्यास 600 मीटरपर्यंतच्या वीज जोडणी खर्चाचा परतावा वीज बिलातून देण्यात येणार आहे, मात्र त्यापेक्षा अधिक अंतरावर जोडणीस खर्चासह परतावा मिळणार नाही. 

उच्चदाब वितरण प्रणाली कामेही लवकरच 
ज्या पंपाचा वीजपुरवठा खंडित आहे. त्यांना 61 हजार 483 वीज जोडण्या कोटेशनची रक्कम भरून प्रलंबित आहेत. तर 1 लाख 67 हजार 699 वीज जोडणीचे अर्ज मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत. 1 लाख 2 हजार वीज जोडण्या देणे प्रलंबित आहे. या सर्व वीज जोडण्याची प्रक्रिया सुरू करण्याबरोबर उच्चदाब वितरण प्रणालीची कामेही लवकर सुरू करण्यात येतील. 

राज्यात 37 हजार कोटींची थकबाकी 
राज्यातील शेतकऱ्यांकडे 37 हजार कोटींची थकबाकी आहे. लघुदाब, उच्चदाब व पाणीपुरवठा संस्थाच्या ग्राहकांची थकबाकी आहे. 
यात ज्यांची वीज बिलांविषयी तक्रार असेल त्याची वीज बिले दुरुस्त करण्यात येतील. पाच वर्षापर्यंतच्या बिलांची विलंब शुल्क व 18 टक्के व्याज माफ करून केवळ थकबाकी भरावी लागेल, ग्रामपंचायंतीनाही वीज बिलांच्या वसुलीची मान्यता देण्यात येईल. त्यासाठी प्रती बिल पाच रुपये तर चालू बिलासाठी वसुलीसाठी रकमेच्या 20 टक्के थकबाकीच्या रकमेसाठी 30 टक्के रक्कम मोबदला देण्यात येईल.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शरद पवारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, दुष्काळासंदर्भात केल्या १७ मागण्या

Premanand Maharaj Disciple Death : आश्रमाच्या छतावरून खाली पडले अन् मृत्यू; प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यूचं गूढ कायम

Competitive Exam Success Story: जिद्द, चिकाटी अन् मेहनतीला यशाची साथ; तीन माजी विद्यार्थ्यांची यशाला गवसणी, जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहलीचा महापराक्रम! तेंडुलकरनंतर वन डेत असा विक्रम नोंदवणारा पहिलाच; शुभमन गिलचेही शतक

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

SCROLL FOR NEXT