MSEDCL will reach customers through WhatsApp in ichalkaranji 
कोल्हापूर

महावितरण व्हाटसअॅपद्वारे पोहोचणार ग्राहकांपर्यंत.... 

ऋषीकेश राऊत

इचलकरंजी - कोरोनामुळे प्रत्येकजण आपल्या दैनंदिन कामात बदल करत असताना दिसत आहे. आता महावितरण व्हाटसअॅपद्वारे ग्राहकांपर्यंत पोहोचणार आहे. सुरवातीच्या काळात प्रादेशिक कार्यालय ते ग्रामीण भागातील जनमित्र यांच्यापर्यंत सर्वाधिक महसुल देणाऱ्या 200 वीज ग्राहकांचे व्हाटस्‌अॅप ग्रुप तयार केले जाणार आहेत. त्यामुळे आता ग्राहकांच्या अडीअडचणीचे निराकारण करणे सोपे जाणार आहे. 
महावितरण आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे ग्राहक सेवा देतच आहे. ऑनलाईन तक्रार, टोल फ्री क्रमांक याद्वारे आधीपासूनच ग्राहकांच्या अडचणींचे निरसन केले जात आहे. कोरोनाच्या लॉकडाउनमुळे उद्‌भवणारे दूरगामी परिणाम लक्षात घेता महावितरण वीज ग्राहकांना सेवा देण्याबाबत योजना आखत आहे. वाढीव वीज बिलामुळे ग्राहकांच्या समस्या सोडविण्यात महावितरणची डोकेदुखी वाढली आहे. मात्र आता ग्राहकांशी व्हाटसअॅपद्वारे महावितरणाचा जोडणारा संवाद प्रभावी ठरणार आहे. 

कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, शाखा अभियंता (शहर व ग्रामीण), जनमित्र यांचा पदनिहाय 200 ग्राहकांचा व्हाटसअॅप ग्रुप तयार करून ग्राहकांसोबत नियमीत संवाद ठेवण्याचे उपक्रम सुरू करण्यात येतील. उच्चदाब औद्योगिक ग्राहक, लघु उद्योजक, स्थानिक लोकप्रतिनिधींपासून ते ग्रामीण भागातील सरपंच, ग्रामसेवक, घरगुती ग्राहक यांना कार्यक्षेत्रानुसार व्हाटसअॅप ग्रुपतर्फे समाविष्ठ केले जाईल. वीज पुरवठा व्यवस्थेत महावितरण आता इतरांनाही सामावून घेत असल्याने वीज पुरवठा संबंधीत प्रत्येक समस्याची त्वरीत निवारण करता येणार आहे. 
 
निराकारण आणि जनजागरण 

वीज ग्राहकांना व्हाटसअॅपद्वारे ऑनलाईन पेमेंट, तक्रारी दाखल, विद्युत सुरक्षा आदींची पूरक माहिती दिली जाईल. वीज पुरवठा बंद ठेवण्याचा अथवा तांत्रिक खंडीत वीजेचा संभाव्य कालावधी यांची माहिती तसेच तारा तुटणे, तारा लोबंकळणे यासह विविध तक्रारींची त्वरीत नोंद घेऊन उपाययोजना करण्यात येतील. 

सर्वाधिक वीज ग्राहक इचलकरंजी विभागात 

  • घरगुती : 83 हजार 105 
  • वाणिज्य : 10 हजार 494 
  • औद्योगिक व यंत्रमाग : 15 हजार 279

संपादन - मतीन शेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate latest News : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार ; राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

Latest Marathi News Live Update : केडीएमसीच्या निवडणुकीसाठी नऊ ठिकाणी मतमोजणी

Ishan Kishan : १० षटकार, ६ चौकार! इशान किशनचे वादळी शतक; अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी, पूर्ण केल्या ५०० धावा

31 Dec Deadline alert : ३१ डिसेंबर शेवटची संधी!, बँक अन् ‘आधार’शी संबंधित 'ही' महत्त्वाची कामे केली नाहीत, तर पडेल महागात!

'एक दो तीन' गाण्यावेळी माधुरी दीक्षितसोबत नक्की काय घडलं? की, सरोज खान वैतागून म्हणाल्या...'तू घरी जा...'

SCROLL FOR NEXT