MSRTC ST Electronic ticket machine error 
कोल्हापूर

एसटी इलेक्ट्रॉनिक्स तिकीट मशिन ठरतेय डोकेदुखी

संघटना राज्यव्यापी आंदोलन करण्याच्या तयारीत

शिवाजी यादव

कोल्हापूर : एसटी महामंडळाने वाहकांना इलेक्ट्रॉनिक्स तिकीट मशिन पुरवली आहेत. त्यांतील निम्म्याहून अधिक मशिन सदोष असल्याने वाहकांना मनस्ताप सोसावा लागत आहे. गेल्या दहा वर्षांपासून एकाच कंपनीला ४०० कोटींचा ठेका दिला व त्याच कंपनीला मुदतवाढ दिली. हा ठेका सहजासहजी अन्य कंपनीकडे जाणार नाही, याची काळजी काही अधिकाऱ्यांनी घेतली असल्याची चर्चा आहे. यातून सदोष मशिन वापरावी लागत असल्याने एसटी वाहकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. एसटी संघटना राज्यव्यापी आंदोलनाच्या तयारीत आहेत.

एसटी महामंडळ १८ हजार गाड्यांतून रोज ४० लाख प्रवाशांची प्रवासी वाहतूक करते. त्यांतून राज्यातील ८ ते १० कोटींचा महसूल मिळतो. त्यातून प्रवाशांना चांगली सेवा देण्याची जबाबदारी महामंडळाची आहे.

इलेक्ट्रॉनिक्स तिकीट मशिनचा ठेका दादरमधील ट्रायमॅक्स कंपनीला देण्यात आला. त्यांनी राज्यभरात ६० ते ७० हजार मशिन दिली. यामध्ये विशिष्‍ट सॉफ्टवेअर बसवले आहे. यातून कागदी तिकिटे बाहेर येतात. किती प्रवाशांना तिकिटे दिली, एकूण किती पैसे जमा झाले, तारीख, वार, वेळ या नोंदणीसह सर्व हिशेब एसटी महामंडळकडे जमा होतो. प्रवाशांना झटपट तिकिटे मिळतात. असे हे मशिन वाहकांसाठी जरूर वरदान ठरले; मात्र कालांतराने मशिन बंद पडणे, बटणे खराब होणे, छापील रक्कम फुसट होणे, कागदी रिळ अडकणे अशा अनेक तक्रारी येऊ लागल्या. अशा तक्रारी दहा वर्षांपासून आहेत.

दर चार वर्षाला ठेका बदलणे अपेक्षित असताना त्याच कंपनीलाच तीन वेळा मुदतवाढ दिली. त्यासाठी जवळपास ४०० कोटींचा खर्च झाला. एवढे होऊनही मशिनची सेवा चांगली मिळत नाही. एसटीचे नुकसान होते. तरीही कंपनीवर कारवाई झालेली नाही. अन्य कंपन्या अशा प्रकारच्या मशिनचा पुरवठा करू शकतात; मात्र त्यांना कंत्राट देण्यात तांत्रिक अडचणी उभ्या करून एसटीने डावलले आहे.

इलेक्ट्रॉनिक्स तिकीट मशिनबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही एसटी महामंडळाने दखल घेतलेली नाही. महिन्याभरात संबंधित कंपनीने नादुरुस्त मशिन बदलून दिली नाहीत, तर आम्ही महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉंग्रेस (इंटक) तर्फे राज्यव्यापी आंदोलन करू.

-मुकेश तिगोटे, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र वर्कर्स कॉंग्रेस इंटक

इलेक्‍ट्रॉनिक्स मशिन वारंवार बिघडते ही बाब वाहकांसाठी डोकेदुखी आहे. अनेकदा कागदी रिळही वाहकांना स्वतःचे पैसे घालून बसवावे लागते. बंद पडलेले मशिन तत्काळ दुरुस्त करून मिळत नाही, तसेच बदलूनही मिळत नाही. एसटीच्या वरिष्‍ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून चांगली मशिन वाहकांना द्यावीत.

- उत्तम पाटील, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कर्मचारी संघटना.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

Pune Drone Cluster: पुण्यात ड्रोन अन् खाद्यप्रक्रिया क्लस्टर; राज्यातील पहिलाच उपक्रम, भोसरी, हडपसरमध्ये सुरू होणार प्रकल्प!

Pandharpur News: पंढरपुरातील प्रस्तावित कॉरिडॉरला तीव्र विरोध; सुब्रह्मण्यम स्वामींच्या मोहिमेस पाठिंबा देण्यासाठी बाधितांचा शंखनाद!

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Solapur News: भारताच्या दणदणीत विजयानंतर सोलापुरात जल्लोष; पाकिस्‍तानला लाेळविताच आतषबाजी, पेढे वाटून, तिरंगा उंचावून आनंदोत्सव साजरा!

SCROLL FOR NEXT