Mujori of foreign workers raised their hands on the sarpanch 
कोल्हापूर

परप्रांतीय कामगारांची मुजोरी सरपंचांवर उचलला हात

सकाळ वृत्तसेवा

तारदाळ (कोल्हापूर) : परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावाकडे सोडण्याचे नियोजन होत असतानाच खोतवाडी येथील सरपंचांवरच पाचशे कामगारांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. कामगारांनी दहशत माजवली. घटनास्थळी शहापूरचे पोलिस निरीक्षक प्रकाश निकम, जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे आणि पोलिसांनी दहशत मोडून काढली. परिसरात दोन तास पोलिसांचा फौजफाटा हजर होता.

गेले चार दिवस ग्रामपंचायतीच्या माध्यमातून खोतवाडी आणि परिसरामध्ये असणारे परप्रांतीय कामगारांना दररोज तीनशे ते चारशे कामगारांना त्यांच्या गावाकडे सोडण्यासाठी पाच ते सहा गाड्‌यांचे नियोजन केले आहे. दररोज कामगार जात आहेत; परंतु आज सकाळी दहा वाजता परप्रांतीय कामगार एकत्र येत सरपंचांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यामुळे परिसरात गोंधळ माजला. यावेळी काही गावातील नागरिकांनाही धक्काबुक्की झाली. सरपंच संजय चोपडे गेली पंधरा दिवस खोतवाडी आणि परिसरातील कामगारांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गेल्या चार दिवसात पंधराशेवर कामगारांना पाठविले. असे असताना कामगारांनी सरपंच संजय चोपडे यांच्याबरोबर वाद घालीत हल्ल्याचा प्रयत्न केला. पाचशेवर असणाऱ्या कामगारांनी काही काळ दहशत माजवली होती.

दरम्यान, पोलिस निरीक्षक प्रकाश निकम फौजफाट्यासह येताच दहशत करणारे कामगार पळून गेले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, ग्रामपंचायत सदस्य गजानन नलगे अनिल माने यांच्यासह सदस्यांनी जमाव पांगवून कामगारांना शांत करण्याचा प्रयत्न केला प्रयत्न केला. दरम्यान डीवायएसपी गणेश बिरादर यांनी भेट देऊन मारामारी करणाऱ्या कामगारांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले. याप्रकरणी 7 कामगारांना ताब्यात घेतले आहे. कामगारांनी सरपंचांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने संबंधित दहशत माजविणाऱ्या कामगारांवर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

- ग्रामपंचायत सदस्यांसह तलाठी व लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्यातून परप्रांतीय कामगारांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्यांच्या भोजनाची सोय ग्रामस्थांनी केली आहे. पंधराशे कामगार सोडले आहेत. असे असताना बिहारच्या कामगारांनी अतितायीपणा करून माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. 
- संजय चोपडे, खोतवाडी सरपंच 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : आजचा दिवस प्रत्येक हिंदू आणि मराठी माणसासाठी अत्यंत महत्त्वाचा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गुढीपाडव्यानिमित्ताने वक्तव्य

Pune Satara Highway: पुणे-सातारा महामार्गावर हरिश्चंद्री येथे तीन फूट पाणी; गारांसह जोरदार अवकाळी पाऊस, पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा!

Chandrashekhar Bawankule: राज्यातील जमिनींचे ‘मायक्रो झोनिंग’ होणार: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; मुद्रांक सुधारणा विधेयक मंजूर!

India Pakistan Nuclear Risk : भारत-पाकिस्तान अणुयुद्ध कधीही पेटू शकते, कोणी केला खळबळजनक दावा?

Panchang 19 March 2026: आजच्या दिवशी बृहस्पती कवच स्तोत्राचे पठण आणि ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT