Multipurpose auditorium at Chhatrapati Shivaji Stadium
Multipurpose auditorium at Chhatrapati Shivaji Stadium 
कोल्हापूर

छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये बहुउद्देशीय सभागृह

संदिप खांडेकर

कोल्हापूर, : छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये बहुउद्देशीय सभागृहाकरिता (मल्टिपर्पज हॉल) जिल्हा क्रीडा कार्यालयाने केंद्र सरकारच्या खेलो इंडिया योजनेंतर्गत मंत्रालयात प्रस्ताव पाठविला. सभागृहासाठी आठ कोटी 75 लाख रुपयांचा आराखडा तयार केला असून, इनडोअर गेमसाठी सभागृह महत्त्वाचे ठरणार आहे. 
शहराच्या मध्यवर्ती परिसरात छत्रपती शिवाजी स्टेडियम असून, ते क्रिकेटसाठी ओळखले जाते. जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे होणाऱ्या शालेय क्रीडा स्पर्धेत स्पर्धेंतर्गत मैदानावर खो-खो, फुटबॉल व क्रिकेटचे सामने घेण्यात येतात. अन्य क्रीडा प्रकारांसाठी क्रीडा कार्यालयाला शहरातील विविध ठिकाणांचा शोध घ्यावा लागतो. तेथे स्पर्धेचे आयोजन करावे लागते. विशेष म्हणजे शालेय क्रीडा स्पर्धांना पावसाळ्यात प्रारंभ होत असल्याने स्पर्धेचे वेळापत्रक कोलमडून जाते. ते बदलून तारखा निश्‍चित कराव्या लागतात. त्याचा नाहक त्रास क्रीडाधिकाऱ्यांना सहन करावा लागतो. 
छत्रपती शिवाजी स्टेडियममधील क्रीडा कार्यालयाच्या परिसरात बहुउद्देशीय सभागृह साकारण्यासाठी जागा उपलब्ध आहे. येथे सभागृह बांधल्यावर तेथे कबड्डी, खो-खो, टेबल-टेनिस, बुद्धिबळ, कॅरम, जिम्नॅस्टिक्‍स, योगा, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल असे विविध खेळ आयोजित करता येतील. साधारणपणे 120 बाय 90 फूट आकाराचे सभागृह खेळाडूंसाठी उपलब्ध होणार आहे. त्यात मुले व मुलींसाठी स्वतंत्र चेंजिंग रूम केल्या जाणार आहेत. या सभागृहाचा प्रस्ताव क्रीडा कार्यालयाने प्राथमिक स्वरूपात तयार केला होता. त्यातील त्रुटींची दुरुस्ती करून तो मंत्रालयात पाठविला आहे. तेथून तो केंद्र सरकारकडे पाठविल्यावर त्याला ग्रीन सिग्नल मिळेल, असा क्रीडा कार्यालयाला विश्वास आहे. त्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची आवश्‍यकता आहे. 


सभागृहासाठी प्रस्ताव पाठविला आहे. त्याला ग्रीन सिग्नल मिळाल्यावर त्वरित त्याचे काम सुरू केले जाईल. एका छताखाली इनडोअर क्रीडा स्पर्धा व्हाव्यात, हीच आमची इच्छा आहे. 
- डॉ. चंद्रशेखर साखरे, जिल्हा क्रीडा अधिकारी 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Elections 2024: नगरमध्ये PM मोदींनी लालूंवर सोडले टीकास्त्र! मुस्लिम आरक्षणावरून सुरू झाला वाद, काय म्हणाले?

Ajit Pawar : दत्ता भरणेंचा शिवीगाळ केल्याच्या व्हिडिओ व्हायरल; अजितदादा म्हणतात, हस्तक्षेप केला कारण...

Gold Investment: सोन्याचे भाव भिडले गगनाला.. यंदाच्या अक्षय तृतीयेला सोने खरेदी करावी का? तज्ज्ञ काय सांगतात

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली - नरेंद्र मोदी

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : कोल्हापूर-हातकणंगलेमध्ये मतदानावरुन वाद

SCROLL FOR NEXT