Mumbai Kolhapur flight started Attempts to facilitate six days a week 
कोल्हापूर

मुंबई-कोल्हापूर विमानसेवा सुरू ; आठवड्यातून या तीन दिवशी सेवा राहणार सूरू

सकाळ वृत्तसेवा

उजळाईवाडी (कोल्हापूर)  : कोरोना संसर्गामुळे सात महिन्यांपासून खंडित झालेली कोल्हापूर-मुंबई विमानसेवा आजपासून पूर्ववत सुरू झाली असून, आठवड्यातील मंगळवार, बुधवार व गुरुवार, अशी सलग तीन दिवस ही विमानसेवा नियमितपणे सुरू राहणार आहे. २४ मार्चपासून बंद असलेल्या  ट्रु जेट कंपनीच्या विमानाने आज दुपारी २ वाजून ४५ मिनिटांनी  ३० प्रवाशांसह कोल्हापुरात लॅंडिंग केले, तर ३ वाजून ५ मिनिटांनी या विमानाने परत २५ प्रवाशांसह मुंबईसाठी टेकऑफ केले.

मुंबई-कोल्हापूर या विमान सेवेला आतापर्यंत प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विमानतळावर विमान उड्डाण्णांना मर्यादा असल्यामुळे आठवड्यातून फक्त तीन दिवस मंगळवार, बुधवार, गुरुवार ही विमानसेवा आजपासून नियमित सुरू राहणार आहे. मुंबई विमानसेवा सुरू व्हावी, अशी प्रवाशांची जोरदार मागणी होती. परंतु, मुंबईमधील मर्यादित विमान उड्डाणामुळे ही विमानसेवा सुरू करणे अशक्‍य बनले होते. मात्र, कोल्हापुरातील लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन व विमानतळ प्राधिकरणाच्या विशेष व अथक प्रयत्नातून मुंबई कोल्हापूर विमानसेवा पुन्हा 
सुरू झाली आहे. 

१५ नोव्हेंबरनंतर मुंबई विमानतळावरील विमान उड्डाणाच्या मर्यादा शिथिल होऊन उड्डाणे पूर्ववत झाल्यानंतर पूर्वीप्रमाणे आठवड्यातून सहा दिवस विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- कमलकुमार कटारिया, संचालक, कोल्हापूर विमानतळ प्राधिकरण
 

महेश कोठारे यांचे विमानाने आगमन
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक महेश कोठारे यांचे मुंबई विमानाने कोल्हापुरात आगमन झाले. यावेळी त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी गर्दी केली होती.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Gangwar : कोल्हापुरात गुंडाचा निर्घृण खून, गँगवारची शक्यता; मध्यरात्री पाटलाग करून खून

Chakan Update : पुन्हा अतिक्रमण केल्यास गुन्हा दाखल होणार; चाकणमध्ये पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे यांचा इशारा

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी कोठडी मृत्यू प्रकरणात; ‘कोठडीतील मृत्यूच्या संदर्भात मार्गदर्शक सूचनांसाठी शपथपत्र दाखल करा’

सर्जरी अर्धवट सोडली अन् नर्ससोबत संबंध ठेवण्यासाठी गेला पाकिस्तानी डॉक्टर, दुसऱ्या नर्सनं आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं अन्...

३०० वर्षानंतर मानवी शरीरात आढळला नवा अवयव, कॅन्सर उपचारात होऊ शकतो बदल

SCROLL FOR NEXT