Youth committee meeting  sakal
कोल्हापूर

Kolhapur: सीमाप्रश्नी मुंबई आंदोलनात सहभागी व्हा;निपाणी भागातील मराठी भाषिकांना आवाहन

आंदोलनात सहभागी होणाऱ्या सर्वांना राहण्याची व जेवणाची सोय असणार आहे. जे कार्यकर्ते वैयक्तिक वाहनातून आंदोलनासाठी निघणार आहेत,अशांनी समिती कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. कारण..

सकाळ वृत्तसेवा

निपाणी - मुंबईच्या आझाद मैदानावर सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बेळगावमधील मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वात धरणे आंदोलन होत आहे.

त्यात निपाणी भागातील मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र एकीकरण निपाणी भाग युवा समितीकडून करण्यात केले.

मुंबईला जाण्याच्या नियोजनासाठी महाराष्ट्र एकीकरण निपाणी विभाग युवा समिती पदाधिकारी, कार्यकर्त्यांची कुर्ली (ता. निपाणी) बैठक झाली.

यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. आंदोलनात सहभागी होणाऱ्या सर्वांना राहण्याची व जेवणाची सोय असणार आहे. जे कार्यकर्ते वैयक्तिक वाहनातून आंदोलनासाठी निघणार आहेत,

अशांनी समिती कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. कारण आंदोलनासाठी जाणा-या सीमाभागातील वाहनांना टोलनाका विनाशुल्क केला आहे. मात्र त्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे स्टिकर वाहनाला लावणे बंधनकारक आहे.

काही कार्यकर्ते रेल्वेने आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले. निपाणी भागातून जास्तीत जास्त मराठी भाषिकांनी सहभागी व्हावे.

बैठकीस महाराष्ट्र एकीकरण निपाणी विभाग युवा समितीचे अध्यक्ष बंडा पाटील, सरचिटणीस अमोल शेळके, हिंदुराव मोरे, सुनील किरळे, नानासाहेब पाटील, शिवाजी पाटील, राहुल काटे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT