munday Worship of Ambabai 
कोल्हापूर

पन्हाळ्यावरील नागांना दर्शन रूपात श्री अंबाबाईची पूजा 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आज करवीर निवासिनी श्री अंबाबाईची पन्हाळ्यावरील नागांना दर्शन रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. पराशर मुनींच्या पन्हाळ्यावरील विष्णुरूपी पुत्रप्राप्तीसाठीच्या तपोसाधनेची झळ नागलोकांना होवू लागली. त्यामुळे त्यांनी पराशरांच्या तपात विघ्ने आणली. परंतु शेवटी शापभयाने नागलोक पराशरांनाच शरण जातात व सुरक्षित राहण्यासाठी योग्य जागेविषयी विचारतात. तेंव्हा पराशर मुनी त्यांना करवीर क्षेत्री जावून श्री अंबाबाईचे दर्शन घेवून देवीला याबाबत विचारण्यास सांगतात. त्यामुळे नागलोक अंबाबाईचे दर्शन घेवून तिची स्तुती करतात, असे या पुजेचे महात्म्य असल्याचे श्रीपूजक मकरंद मुनीश्‍वर व माधव मुनीश्‍वर यांनी सांगितले. 

बुधवारी ललिता पंचमी 

बुधवारी (ता. 21) ललिता पंचमीचा सोहळा होणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा अत्यंत साधेपणाने हा सोहळा होणार असून यानिमित्ताने भरणारी त्र्यंबोली यात्राही रद्द करण्यात आली आहे. श्री अंबाबाई, श्री तुळजाभवानी व गुरूमहाराज वाड्यातील पालख्या सजवलेल्या वाहनांतून टेंबलाई टेकडीवर रवाना होतील आणि दुपारी बाराच्या सुमारास कोहळा फोडण्याचा पारंपरिक विधी मोजक्‍याच मानकऱ्यांच्या उपस्थितीत होईल. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET SCAM : नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट ! सीबीआयच्या अटकेत असलेल्या मनीषा मांढरे यांचे कॉलेजकडून निलंबन

ITR Update: आयकर विभागाने जारी केले सर्व ITR फॉर्म! तुमच्यासाठी कोणता योग्य? ऑनलाइन रिटर्न कसा भराल? जाणून घ्या

Kerala CM VD Satheesan : कोण आहेत केरळचे नवे मुख्यमंत्री व्ही.डी. सतीशन? 'इतक्या' संपत्तीचे आहेत मालक...

Latest Marathi News Live Update : श्रीक्षेत्र पुरुषोत्तमपुरी येथे अधिकमासाच्या पहिल्याच दिवशी भाविकांच्या ५० तोळे सोन्यावर चोरट्यांचा डल्ला

Pune Hospital: माणुसकीला काळिमा! पुण्यातील हॉस्पिटल वाद चिघळला, १३ तासांचे बिल ३.२५ लाख, मृतदेह रोखून धरल्याचा आरोप, राष्ट्रवादीचे नगरसेवक आक्रमक..

SCROLL FOR NEXT