Municipal contract employees without pay for three months 
कोल्हापूर

महापालिका कंत्राटी कर्मचारी तीन महिने पगाराशिवाय

डॅनिअल काळे

कोल्हापूर ः  कोरोना साथीमध्ये जीवाची बाजी लाऊन काम करणाऱ्या आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना तीन महिन्यापासून पगारच झाला नसल्याने त्यांची ससेहोलपट सुरु आहे. कंत्राटदार, आरोग्य विभाग, आस्थापना विभाग हे या पगाराच्याबाबतीत एकमेकाकडे बोट दाखवून बेजबाबदारपणे वागत असल्याचे समोर आले आहे. गोरगरीब आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अखेर आज प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्याकडे व्यथा मांडली. 
सुरवातीला महापालिकेचा कांही संबध नाही, एसपी एंटरप्रायजेस कंपनीचेच ते कर्मचारी असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र आता महापलिकेनेच कंत्राटदाराचे बिल दिले नसल्याने त्यांचे वेतन थकित असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकाराची खात्री करुन कार्यवाही करु, असे आश्‍वासन प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दिले आहे. 
कोरोना काळात अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कंत्राटी भरती करण्यात आली. कोरोना काळात विविध अमिषे दाखवून कंत्राटदाराकडून ही कामे करुन घेण्यात आली. पण या कामाची बिले वेळेवर अदा केली जात नाहीत किंवा त्याबाबतीत योग्य त्या प्रक्रियाच पार पाडल्या नसल्याच्या कांही बाबी समोर येत आहेत. पण याचा फटका मात्र गोरगरीब कर्मचाऱ्यांना बसत आहेत. 

कंत्राटी कंपन्यांकडूनही लूट 
महापालिकेच्या आस्थापना खर्च वाढल्याने कोणतीही भरती करायची झाल्यास ती कंत्राटी पध्दतीने केली जाते. महापालिकेच्या विविध विभागाकडे असे कंत्राटी कर्मचारी आहेत. त्यांची संख्या मोठी आहे. पण ज्या कंपन्यांना या कामाचे ठेके मिळतात. त्या कंपन्या प्रत्येक कर्मचाऱ्यामागे दरमहा चौदा हजारांप्रमाणे पैसे आकारतात. प्रत्यक्षात कर्मचाऱ्याच्या हातावर सात ते आठ हजार ठेवले जातात. उर्वरित पैसे ठेकेदार कंपन्याच घेत आहेत. धोकादायक आणि जोखीम घेऊन कामे करुनही कमी पैसे या कर्मचाऱ्यांना मिळत आहेत. 

संपादन - यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: श्रेयस अय्यरचे शतक, जिंकूनही पंजाब किंग्सची प्ले ऑफमधील जागा पक्की नाहीच... जाणून घ्या समीकरण

IPL 2026 KKR Playoff Scenario : कोलकाता नाइट रायडर्ससमोर अवघड गणित! पंजाबला नेट रन रेटमध्ये मागे टाकायचे असेल तर...

थायलंडला जाणं महागणार! भारतीयांसाठी Visa Free Entry रद्द; नवीन नियम लागू, आता प्रवेश कसा मिळणार?

Arjun Tendulkar: अर्जुनसोबत चुकीची वागणुक, त्यात रिषभ पंतने 'पारा' चढवला... सचिनचा मुलगा संतापला; नेमकं काय घडलं?

Monsoon Progress Update : मॉन्सूनची प्रगती हवामान विभागाचा दुजोरा, काही तासात केरळात दाखल; अरबी समुद्राचा भाग व्यापला

SCROLL FOR NEXT