municipal corporation election analysis by daniel kale 
कोल्हापूर

पदांच्या खांडोळ्या करण्याची रीत: कार्यकर्त्यांना जपण्यातच धन्यता

डॅनियल काळे

कोल्हापूर:  पालिकेच्या निवडणुकीचा राजकीय आखाडा आता तापत चालला आहे. पालिकेच्या राजकारणात अनेक चालीरिती रुढ आहेत. त्या जुन्या आणि नव्या नेतृत्वाच्याही अंगवळणीच पडल्यासारखी स्थिती आहे. महत्त्वाच्या पदाच्या कालावधीच्या खांडोळ्या हीदेखील रीत बनली आहे. नेतृत्व बदलले, अपक्षांच्या सत्ता गेल्या, पक्षांच्या सत्ता आल्या; पण पदाच्या खांडोळ्या व्हायची ही रीत मात्र कायम आहे. महापौरपदासारख्या महत्त्वाच्या पदाच्याही खांडोळ्या झाल्या.

तीन महिने, सहा महिन्यांचेही महापौर झाले. एक सभा महापौर निवडीची, मध्ये एखादीच सभा हाताळायला मिळते न मिळते, तोच त्यानंतरच्या येणाऱ्या सभेत राजीनामा असेही दृश्‍य पाहायला मिळाले. शहर विकासाचा आणि सार्वजनिक हिताचा विचार केला, तर मात्र हे नक्कीच चुकीचे आहे; पण सार्वजनिक हित आणि शहरविकासापेक्षा अधिकाधिक कार्यकर्त्यांना पदावर बसवून स्वनेतृत्व घट्ट करणे, यालाच महत्त्व प्राप्त आहे.

महापौरपदासारख्या महत्त्वाच्या पदावर काम करण्याची संधी मिळावी, अशी प्रत्येक नगरसेवकाची इच्छा असते. मात्र अधिकाधिक लोकांना संधी देण्यासाठी खांडोळ्या करणे, हे मात्र चुकीचे आहे. राज्य सरकारनेही अशा पदावर काम करणाऱ्या व्यक्तींना पुरेसा वेळ मिळावा, यासाठी अडीच वर्षे कालावधी ठरवून दिला आहे; पण सुरवातीला या कालावधीचे दोन तुकडे झाले. नंतर चार, पाच आणि सहादेखील तुकडे झाल्याचे पाहिले आहे. अगदी दोन महिन्यांचा महापौरही पाहायला मिळाला आहे. 


महापौरपद हे शोभचे नाही, तर या पदाच्या माध्यमातून शहराच्या विकासात योगदान देण्याची संधी हे पद भूषविणाऱ्यांना मिळते; पण बऱ्याच जणांना विशेषतः कांही महिलांना हे पद केवळ शोभचे आणि मिरवायचेच आहे, असा भास निर्माण करून देण्याबाबत पदाच्या खांडोळ्याची ही रीत रुजली आहे. याला बगल देउन शहर विकासासाठी कालावधी पूर्ण करणारा महापौर अथवा स्थायी समिती सभापती करण्याची हिम्मत कोणता राजकीय पक्ष दाखविणार का?की पुन्हा पदाच्या कालावधीच्या खांडोळ्याच पहात बसण्याची वेळ नागरिकांवर येणार. 

पदे देण्याचा अजेंडा

पदाच्या खांडोळ्या केल्यामुळे शहराच्या विकासाचा अजेंडा बाजूला राहतो आणि लोकांना पदे देण्याचाच अजेंडा सध्या पुढे येत आहे. यामुळे महापौरपदासारख्या पदाची प्रतिष्ठा कमी होत आहे. सरकारनेही अशा पदावर काम करणाऱ्या व्यक्तींना पुरेसा वेळ मिळावा, यासाठी अडीच वर्षे कालावधी ठरवून दिला आहे.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT