Municipal Corporation impose a fine doglovery marathi news kolhapur 
कोल्हापूर

सावधान : पाळीव प्राण्यांना फिरायला घेऊन जाताय

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: सकाळी सकाळी माॅर्निक वाॅकला जात असताना प्रत्येकाच्या सवई वेगळ्या असताता. कोणाला मित्रांसोबत जायचं असत तर कोणाला कुटुंबासोबत, काहींना तर पाळीव कुत्र्यांसोबत जायचं असत.  मात्र ही हौस आता येणार अंगलट.पाळीव प्राण्याने रस्त्यावर घाण केल्यास त्याच्या मालकाला १५० रुपये दंडाची आकारणी महापालिका करणार आहे. व्यावसायिकांनी आजूबाजूला कचरा टाकल्यास, पाण्याच्या ठिकाणी कचरा टाकल्यास अथवा ओला तसेच सुका असे कचऱ्याचे वर्गीकरण न केल्यास १५० रुपये दंड होणार आहे.

महापालिकेचा निर्णय; घाण केल्यास मालकाला दंड

सकाळी तसेच सायंकाळी पाळीव कुत्री घेऊन फिरायला नागरिकांच्या संख्येत वाढ झाली आहे. अन्य लोक व्यायामासाठी येतात याचे भान कुत्र्यांच्या मालकांना नसते. कुत्री वाटेत घाण करतात आणि त्याचा मनःस्ताप लोकांना सहन करावा लागतो. कुत्री पाळण्याचा छंद काहींनी असला तरी सार्वजनिक ठिकाणे कुत्री फिरविण्यासाठीच आहेत असा काहींचा गैरसमज झाला आहे.

विक्रेत्यांसह कुत्र्यांचे मालकही रडारवर
 
कुत्र्यांप्रमाणे भटक्‍या जनावरांचा वाहतूकीसाठी अडथळा ठरत आहे. दिवसभर रस्त्यावर सोडलेली जनावरे सायंकाळी मालकाच्या घरी परतात. पाळीव प्राणी मग तो कोणतीही असोत त्यांनी घाण केल्यास थेट मालकाला दंड करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. शहराच्या विविध भागात खाद्यपदार्थांच्या गाड्या लागल्या आहेत. ते कचरा लगतच्या रस्त्यावर टाकतात. असा कचरा आढळल्यास संबंधिताला दीडशे रुपयांचा दंड भरावा लागेल. तलाव.

नदी, पाणवठे येथेही कचरा टाकल्यास याच पटीत संबंधिताला दंड होणार आहे. प्रत्येक प्रभागात कचरा उठावासाठी घंटागाडी येतात. तेथेच ओला आणि सुका असे कचऱ्याचे वर्गीकरण महत्वाचे आहे. तसे न करता कचरा टाकला गेल्यास संबंधिताला दीडशे रुपयांचा दंड होईल.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT