The murder of a married woman in Jalait Gdhinglaj
The murder of a married woman in Jalait Gdhinglaj 
कोल्हापूर

जरळी (ता.गडहिंग्लज) येथे विवाहितेचा खून...

सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज - जरळी (ता गडहिंग्लज) येथे एक विवाहितेचा मध्यरात्रीच्या सुमारास खून झाला. आज पहाटे ही घटना निदर्शनास आली. वंदना संगमेश्वर कोणकेरी असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. 

याप्रकरणी तिच्या पतीवर पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. जरळी येथे शेतवाडीत कोणकेरी वसाहत आहे. त्याठिकाणी 10-12 घरे आहेत. संगमेश्वर याचे लग्न 2013 मध्ये झाले आहे. लग्नानंतर काही महिन्यांनीच तो आई वडीलपासून पत्नीसह विभक्त राहतो. या दाम्पत्याला एक चार वर्षांची मुलगी आहे. वंदना रोज सकाळी दूध आणण्यास येत होती. ती आज का अली नाही म्हणून आज सकाळी वंदनाची सासू त्यांच्या घरी गेली. त्यावेळी सासूने जोराची ओरड केली. अचानक काय झाले म्हणून शेजारी धाऊन आले. त्यावेळी वंदना अंथरूनवरच रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिच्या खांदावर व मानेवर धारधार शस्त्राने वार झाले आहेत. 

रात्रीच वंदनाचा खून करून तिच्या पतिने दरवाजाला कडी लावून पसार झाला असा संशय व्यक्त होत आहे. संगमेश्वर ची मुलगी गावी गेली आहे. यामुळे घरी ते दोघेच होते. तीन चार दिवसांपासून त्यांच्यात किरकोळ भांडणे होती. त्यातूनच त्याने रागाच्या भरात खून केला असावा असा पोलिसांचा संशय आहे. संगमेश्वर हा गवंडीच्या हाताखाली काम करतो. शेतीही करतो. या घटनेने जरळी परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक दिनेश काशीद व पोलीस कर्मचार्यांनी भेट देऊन पंचनामा केला.

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT