murder of wife and nephew in rashivde kolhapur  
कोल्हापूर

त्याला आला राग... अडकीत्त्यानेच केला बायको व मेव्हण्याचा खून...

सकाळ वृत्तसेवा

राशिवडे बुद्रुक (ता.राधानगरी) - येथे कौटुंबिक वादातून पतीने केलेल्या चाकू हल्यात पत्नी आणि मेव्हणा यांचा खून झाला. आज सकाळी साडेअकरा वाजता येथील ग्रामपंचायतीच्या समोरच ही थरारक घटना घडली. मंजाबाई सदाशिव कावणेकर (वय 45 रा. राशिवडे)  व मेव्हणा केरबा हिवराप्पा एडके (वय 40 रा.कोथळी ता.करवीर) अशी मृत व्यक्तींची नाव आहेत. 

   याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी : हल्लेखोर सदाशिव खानू कावणेकर (वय 52) आणि त्यांच्या पत्नी मंजाबाई यांच्यात गेली वर्षभर कौटूंबीक वाद सुरू आहे. यातून वेळोवेळी खटके उडत होते. याबाबत गेल्या आठवड्यात राधानगरी पोलिस ठाण्यात सदाशिव याने पत्नीच्या विरोधात तक्रार केली होती. त्यानंतर कौटूंबीक वाद विचारात घेता आणि  समज देवून सोडले होते.

म्हणुन त्याला आला राग...

मात्र वारंवार वाद वाढतच असल्याने आज ग्रामपंचायत कार्यालयात माहितीसाठी भाऊ केरबा एडके यांला घेऊन आल्याचे कळताच सदाशिव यांनी रागाच्या भरात आपल्या खिशातील चाकू सदृश्य अडकित्त्याने मेव्हण्याच्या छाती पोटावर सपासप वार केले. ते पाहून सोडविण्यासाठी गेलेल्या मंजाबाईवरही त्यांने छातीवर आणि गळ्यावर वार केले. यात गंभीर अवस्थेत दोघेही ग्रामपंचायतच्या समोरच असलेल्या पटांगनावर कोसळली याची माहिती मिळताच तातडीने लोकांनी सदाशिव याला पकडून ग्रामपंचायत कार्यालयात डांबून ठेवले. जखमींना तातडीने कोल्हापूर येथील सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. याची माहिती राधानगरी पोलिस ठाण्यात दिल्यानंतर पोलिस निरीक्षक उदय डुबल घटनास्थळी आले ते अधिक तपास करीत आहेत. ग्रामपंचायत कार्यालयात डांबून ठेवलेल्या सदाशिवला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. मृत मंजाबाई या माजी ग्रामपंचायत सदस्य होत्या.

गावचे सरपंच ही झाले जखमी...

हा वाद सोडवयला मध्यस्थिस गेलेले राशिवडेचे सरपंच कृष्णात पोवार यांच्या हाताला जखम झाली.उघड्यावर हा प्रकार घडल्याने लोकांमध्ये घबराट पसरली.जखमीच्या मदतीला सरपंच व गावातीय काही लोकांनी चादरी मध्ये गुंडाळत एक किलो मीटर पर्यत धावत त्यांना येण्यात आले.

कौंटूबीक कलहातून हा प्रकार घडला आहे, हल्लेखोराची पत्नी व मेहणा यांचा यात खुन झाला आहे.आरोपीस ताब्यात घेतले आहे.आम्ही अधिक तपास करत आहोत.

तिरुपती काकडे - अप्पर पोलिस अधिक्षक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची तीव्र प्रतिक्रिया

Video Viral: हृदयस्पर्शी! घाबरलेल्या हत्तीच्या पिल्लाची माणसांकडे धाव, व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

ENG vs IND: जो रुटची विकेट 'बॉल ऑफ द सिरीज'! सचिन तेंडुलकरची शाबासकी; विराट कोहलीकडूनही गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप

SCROLL FOR NEXT