Murder Sakal
कोल्हापूर

दुकान गाळ्याच्या आर्थिक वादातून तारदाळच्या तरूणाचा खून

तारदाळ (ता. हातकणंगले) येथील महादेव निगडे या तरूणाचा खून दुकान गाळ्याच्या आर्थिक व्यवहाराच्या वादातून झाल्याचे देवरूख पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

तारदाळ (ता. हातकणंगले) येथील महादेव निगडे या तरूणाचा खून दुकान गाळ्याच्या आर्थिक व्यवहाराच्या वादातून झाल्याचे देवरूख पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

इचलकरंजी - तारदाळ (ता. हातकणंगले) येथील महादेव निगडे या तरूणाचा खून (Youth Murder) दुकान गाळ्याच्या (Shop) आर्थिक व्यवहाराच्या वादातून (Dispute) झाल्याचे देवरूख पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये सुरज मेहबूब चिकोडे (वय २४,रा. मराठी शाळेजवळ, तारदाळ), गणेश उर्फ हंप्या राजेश शिवारे (वय २८, रा. तारदाळ) याच्यासह एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरिक्षक हेमंतकुमार शहा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या प्रकरणाचा कौशल्यपूर्ण तपास केला.

आंबा घाटातील गायमुख मंदिराजवळ ५ मे रोजी खोल दरीमध्ये सडलेल्या अवस्थेत महादेव याचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी देवरूख पोलिसात ९ मे रोजी खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. मृतदेह सडलेला असल्याने ओळख पटविणे पोलिसांसमोर आव्हान होते. मात्र स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला निगडे हा बेपत्ता झाल्याचे समजले. त्याचे वर्णन आणि मृतदेहाचे वर्णन जुळल्यानंतर तपासाला गती आली. त्यानंतर पथकाने तारदाळ येथे येऊन माहिती घेतली असता खुनाचा प्रकार समोर आला.

याप्रकरणी मुख्य संशयीत सुरज मेहबूब चिक्कोडे व गणेश उर्फ हंप्या राजू शिवारे याच्यासह एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन अटक केली. त्यांनी १६ एप्रिल रोजी मध्यरात्रीनंतर मृतदेह आंबा घाटात फेकल्याचे कबुल केले आहे. यातील सुरज व गणेश याला न्यायालयात हजर केले असता १६ मे पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. याबाबतचा तपास देवरूख पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बाळकृष्ण जाधव करीत आहेत.

तपास मोहिमेत रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरिक्षक श्री. शहा, सहाय्यक फौजदार प्रशांत बोरकर, हवालदार विजय आंबेकर, अरूण चाळके, बाळू पालकर, योगेश नागवेकर, दत्ता कांबळे, सचिन भुजबळराव, संतोष सडकर यांनी सहभाग घेतला. तपासकामी शहापूर पोलिसांसह कोल्हापूर पोलिस दलाचे सहकार्य मिळाले.

सुरज चिक्कोडे सराईत गुन्हेगार

या खून प्रकरणातील मुख्य संशयीत सुरज चिक्कोडे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी जबरी चोरीचे दोन गुन्हे जयसिंगपूर, शहापूर पोलिस ठाणे येथे दाखल आहेत. गुन्हेगारी वर्तुळात रावण गँगचा मुख्य म्होरक्या म्हणून तो कार्यरत असल्याची देवरूख पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT