करनूर ता.कागल येथे कुस्ती लावून मैदानाचे उद्घाटन करताना समरजितसिंह घाटगे, नविद मुश्रीफ व अमरीश घाटगे sakal
कोल्हापूर

मुश्रीफ -घाटगे कुस्ती मैदानाच्या उद्घाटनप्रसंगी एकत्रित

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्यातील आरोप-प्रत्यारोप

सकाळ वृत्तसेवा

कागल : राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कागल तालुक्यातील वातावरण ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे चांगलेच तापले आहे. अशा वातावरणात शाहू ग्रुप चे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे,संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चेअरमन नवीन मुश्रीफ व गोकुळचे संचालक अमरीश घाटगे हे तिघे एकत्र आले. त्यासाठी निमित्त होते ते करनूर ता. कागल येथील ग्रामदैवत मरीआई यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती मैदानाचे. मुश्रीफ -घाटगे यांच्यातील कलगीतु-यात एकमेकांवर टीकेची एकही संधी न सोडता शब्दांचा भडीमार करणा-या या नेत्यांनी कुस्ती मैदानाच्या उद्घाटनप्रसंगी एकत्रितपणे फुले उधळली आणि उदघाटनच्या पहिल्या दोन कुस्त्या सुद्धा लावल्या.

या कुस्ती मैदानासाठी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, खासदार प्रा.संजय मंडलिक,भाजपचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे व माजी आमदार संजयबाबा घाटगे यांना निमंत्रित करण्यात आले होते. खासदार मंडलिक किंवा त्यांचे चिरंजीव या मैदानला उपस्थित राहिले नाहीत.मात्र उर्वरीत तिघांनी बरोबर साडेपाच वाजता करनूरमध्ये हजेरी लावली. सुरुवातीला नविद, त्यानंतर अंबरीश व शेवटी समरजितसिंह दाखल झाले. राजे या ठिकाणी दाखल झाल्यानंतर या ठिकाणी गंभीर वातावरण झाले होते. कारण त्यांच्या आधी आलेले नवीद व अमरीश त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत होते .त्याप्रमाणेच समरजितसिंहही आपल्या कार्यकर्त्यांच्या ताफ्यात मिसळले आणि काही क्षणातच हे तिघे व त्यांच्या पाठोपाठ सर्व कार्यकर्त्यांचा ताफा त्या ठिकाणाहून एकत्रितपणे वाद्यांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत चालत गेले.

छत्रपती शिवरायांना पुष्पहार घालून तिघांनीही अभिवादन केले व एकत्रितपणे कार्यकर्त्यांसह फोटोसाठी पोझ दिली आणि कार्यकर्त्यांची मोबाईलवर ही छबी टिपण्यासाठी धांदल उडाली. त्यानंतर ग्रामदैवत मरिआईचे दर्शन घेऊन कुस्ती मैदानच्या ठिकाणी हे सर्वजण उपस्थित झाले.व्यासपीठावर नविद मुश्रीफ व समरजितसिंह घाटगे यांच्या मध्ये अमरीश घाटगे बसले होते. या तिघांच्या हस्ते या मैदानाचे उद्घाटन व प्रथम क्रमांकाची कुस्ती लावण्यात आली. त्यानंतर समरजितसिंह घाटगे करनूरमधील काही कार्यकर्त्यांच्या घरी भेट देण्यासाठी थांबले तर नविद मुश्रीफ व अमरीश घाटगे कागदकडे रवाना झाले. मात्र त्यानंतर करनूरसह संपुर्ण तालुकाभर हे तिघे एकत्र आल्याची चर्चा खुमासदारपणे रंगली. सोशल मीडियावर त्याचे फोटो कार्यकर्ते व्हायरल करत होते.

समरजितसिंह घाटगे व नविद मुश्रीफ संवाद मोजकाच

सायंकाळी साडेपाच ते सव्वासहा या ४५ मिनिटांच्या एकत्र असणाच्या कालावधीत दोन्ही घाटगेंमध्ये संवाद सुरू होता. मात्र समरजितसिंह घाटगे व नविद मुश्रीफ यांच्यामध्ये संवाद होताना दिसत नव्हता.त्याला कारणही तसेच होते. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या जन्मतारखेवरील वादाच्या कारणामुळे मुश्रीफ व घाटगे यांच्यामध्ये कलगीतुरा सुरू आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.त्यामुळे या दोघांमध्ये अभावाने संवाद झाल्याचे दिसले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT