Muslim community condemns incident in Ichalkaranji kolhapur marathi news 
कोल्हापूर

पोलिसांना केली धक्काबुक्की अन् घडले असे.....

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी (कोल्हापूर) : करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासह सर्वांचे आरोग्य सुरक्षित रहावे यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशावेळी इचलकरंजीतील गावभागात मोठ्या संख्येने  नागरीक जमले होते. शिवाय कायदा आणि सुव्यवस्था राखणार्‍या पोलिसांना धक्काबुक्की व दगडफेकीचा प्रकार घडला. हा प्रकार अत्यंत निंदनीय असून त्याचा समस्त मुस्लिम समाजाकडून निषेध नोंदविण्यात आला आहे. शासनाच्या सूचनांचे पालन करुन घरातून कोणीही बाहेर पडू नये असे आवाहन  करण्यात आले आहे.

संपूर्ण जगभरात सध्या करोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात जमावबंदी, संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जमावबंदी आदेशाद्वारे देशभरातील सर्वच धर्मस्थळे, मस्जिद, मंदिर, चर्च, गुरुद्वारा बंद  करण्यात आले आहेत. करोनाला रोखण्यासाठी शासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

समस्त मुस्लिम समाजाकडून जाहीर निषेध

समस्त मुस्लिम समाजाचे मौलाना, धर्मगुरू, जबाबदार व्यक्तींना शासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. असे असतानाही हा आदेश धुडकावून लावत गावभागातील प्रार्थनास्थळात मोठ्या संख्येने  नागरीक जमले होते . ही घटना अशोभनीय असून अशा गोष्टींना समाज कदापि थारा देणार नाही. संकटकाळात सहकार्य करण्याऐवजी घडलेली ही घटना निंदनीय आहे. या घटनेचा समस्त मुस्लिम समाजाकडून जाहीर निषेध करण्यात येत आहे.

परिवारासह समाजासाठीच्या मोहीमेत सहभागी

शासनाने 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन पुकारला असून या कालावधीत कोणीही घराबाहेर पडू नये. शासकीय प्रशासन, पोलिस प्रशासन यांच्याकडून केल्या जात असलेल्या सूचनांचे पालन करण्यात यावे. आपण सर्वांनी एकजुटीने जात-पात न मानता आपल्या परिवारासह समाजासाठीच्या मोहीमेत सहभागी झाले पाहिजे. जे लोक याचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर निश्‍चितपणे कायदेशीर कारवाई करण्यात यावी. संचारबंदी काळात शहरात पुन्हा शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल असे प्रकार घडणार नाहीत याचीही सर्वांनी काळजी घ्यावी, असेही आवाहन समस्त मुस्लिम समाजाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज ठाकरेंचा 'फर्स्ट क्लास' प्रवास! लोकलमध्ये गर्दीच्या वेळेतही मिळाली विंडो सीट, मनसेच्या ७ जणांना बसायलाही जागा

MNS- MVA Morcha: मग लोकसभेत ३१ खासदारांनी मतचोरी केली होती का? मविआ-ठाकरेंच्या मोर्चावर भाजपचा सवाल

Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कामांवर 'डिजिटल' नजर! नाशिक कुंभमेळा प्राधिकरणाने विकसित केली ऑनलाइन ट्रॅकिंग प्रणाली

मोठी बातमी! अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना २,५४० कोटींची मदत; रब्बी हंगामासाठी १,७६५ कोटींचे पॅकेज जाहीर

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची समझोता बैठक मुंबईत सुरु

SCROLL FOR NEXT