कोल्हापूर

पूरग्रस्तांच्या घरांवर चोरट्यांचा डल्ला; नागाळा पार्कातील प्रकार

सोन्याच्या दागिन्यांसह लाखोंचा ऐवज लंपास ; पोलिस कर्मचाऱ्यांचा घरांचाही समावेश

राजेश मोरे - सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: नागाळा पार्क, अक्षय पार्क (Nagala Park, Akshy Park) येथील स्थलांतरित झालेल्या पुरग्रस्तांचे चार बंगले चोरट्याने फोडल्याचा प्रकार आज दुपारी उघडकीस आला. यात एका पोलिस कर्मचाऱ्यांच्या घराचाही समावेश आहे. चोरट्याने यात सुमारे तेरा तोळ्याचे सोन्याचे दागिने, दोन एलईडी टीव्ही असा सुमारे पावणे सहा लाखांचा ऐवज लंपास केला. याबाबतची नोंद करण्याचे काम शाहूपुरी पोलिस ठाण्यात सुरू होते. Nagala-Park-Akshy-Park-Thieves-Raid-Kolhapur-flood-crime-news-akb84

याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती,

नागाळा पार्क जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पिछाडीस अक्षय पार्क आहे. येथे २३ जुलैला पुराचे पाणी आले. तसे येथील अनेक कुटुंबे सुरक्षीतस्थळी स्थलांतरित झाली होती. यात सपाटे व भिंगार्डे कुटुंबाचाही समावेश होता. सपाटे कुटुंब आज दुपारी भागातील पाणी किती ओसरले हे पाण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांना आपल्या बंगल्याचे कुलूप तोडलेले दिसले. त्यांनी आज जावून पाहिल्यानंतर बेडरूमधील लाकडी कपाटे उचकटून त्यातील साहित्य विस्कटलेले दिसले. त्यानी याची माहिती शाहूपुरी पोलिसांना दिली.

घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. त्यावेळी त्यांना सपाटे कुटुंबातील दुसराही बंगला चोरट्याने फोडल्याचे निदर्शास आले. या दोन्ही बंगल्यातून चोरट्याने सहा तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या, साडेचार तोळ्याची सोन्याची माळ, सहा ग्रॅमचे टॉप्स्, पाच ग्रॅमचे वळे, दोन एलईडी टीव्ही, प्रोट्रीन्स् असा सुमारे पावणे सहा लाखांचा ऐवज लंपास केल्याचे उघड झाले. तसेच चोरट्याने सपाटे यांच्या शेजारी राहणारे उत्तम मारुती भिंगार्डे यांचा बंद बंगलाचा कडीकोयंडा उचकटून आत प्रवेश केला. येथील लोखंडी व लाकडी कपाटे उचकटून त्यातील साहित्य विस्कटले. पण येथे चोरट्याच्या हाती किमंती ऐवज लागला नाही. दरम्यान याच पार्कात पोलिस कर्मचारी मनोहर कोळी राहतात. ते बंदोबस्तासाठी बाहेरगावी गेले आहेत. त्यांचे बंद घर चोरट्याने फोडल्याचा प्रकारही यावेळी उघड झाला. पण त्यांच्या घरातून नेमका किती किमंती ऐवज चोरीस गेला हे समजू शकले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT