Nagaon Foundry  sakal
कोल्हापूर

नागाव : फाऊंड्री आठवड्यातून ३ दिवस बंद

कच्च्या मालाच्या दरात अस्थिरतेमुळे उद्योजकांचा निर्णय; बचतीची अपेक्षा

अभिजित कुलकर्णी

नागाव: फाऊंड्री उद्योगासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या दरातील अस्थिरतेमुळे अनेक फाऊंड्री उद्योजकांनी सलग तीन दिवस उत्पादन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. खर्चात बचत करण्यासाठी सोमवारी साप्ताहिक सुटीला जोडून शनिवार आणि रविवार उद्योग बंद ठेवण्याचा पर्याय अनेक फाऊंड्री उद्योजकांनी निवडला आहे. यामुळे वीज, कामगार पगार व इतर खर्चातून बचतीची अपेक्षा आहे. दरम्यान, कच्च्या मालाचा पुरवठा करणाऱ्या काही व्यावसायिकांनी दरवाढीसाठी कृत्रिम टंचाई निर्माण केली आहे. अचानक आलेल्या या संकटामुळे उद्योगांतर्गत आर्थिक ताळेबंद कोलमडला आहे.

जिल्ह्यात लहान-मोठे सुमारे दीडशे फाऊंड्री उद्योग आहेत. पन्नास ते पाच हजार टन मासिक कास्टिंग उत्पादन क्षमता असणाऱ्या या उद्योगांत गरजेनुसार कच्च्या मालाचा साठा केला जातो.पिग आयर्न, कोळसा, एमएस स्क्रॅप, सीआय स्क्रॅप, बोरिंग, निकेल, क्रोम, फेरो मिश्र धातू, कोअर मेकिंग आणि कोटिंग्जसाठी रसायने, तांबे, पितळ आणि अॅल्युमिनियम हा फाऊंड्री उद्योगासाठी कमी अधिक प्रमाणात लागणारा कच्चा माल आहे. अनावश्यक साठ्यात पैसा, जागा व मनुष्यबळ विनाकारण अडकून राहते. शिवाय सातत्याने बदलणाऱ्या दरामुळे नुकसानही होण्याची भीती असते. परिणामी प्रत्येक उद्योगात चार ते पाच दिवस काम करता येईल एवढाच कच्च्या मालाचा साठा असतो. मार्चच्या पहिल्या आठवड्यात कच्च्या मालाच्या किमतीत प्रती किलो तीन ते पाच रुपयांची वाढ झाली होती. यात काहीतरी सुधारणा होईल, या अपेक्षेत असणाऱ्या उद्योजकांना रोजच्या दरवाढीला सामोरे जावे लागत असल्याने त्यांनी कच्च्या मालाची खरेदीच थांबवण्याचा निर्णयघेतला आहे.

ग्राहक कंपन्यांच्या व्यवस्थापनाशी दरवाढीसंदर्भात चर्चा सुरू आहे. पुरवठा थांबवणे परवडणार नाही, पण नुकसान सहन करून उद्योग टिकणार नाही. कारण फाऊंड्री उद्योगात परिणाम लगेच दिसत नाही. त्यामुळे ग्राहक कंपन्यांशी चर्चा करतच यातून मार्ग निघेल.

- प्रकाश राठोड,व्यवस्थापकीय संचालक, कॅस्प्रो मेटल ग्रुप.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : स्टार खेळाडूंसोबत शेवटचा'सेल्फी'! १४ वर्षीय अभव, २० वर्षीय क्रिकेटपटूचा जागीच मृत्यू; DC vs RCB सामन्यानंतर भयानक घडलं

ओबेन इलेक्ट्रिककडून Rs. 99,999 रूपये या सुरुवातीच्या किमतीत Rorr EVO सुपर बाइक लाँच; दमदार फीचर्स पाहा

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्ह्यातील खुपिरे येथील सुरभी लॉजवर पोलिसांचा छापा

MLC Election: झीशान सिद्दीकींच्या उमेदवारीमुळे वाद पेटला; एक बडा नेता शिवसेनेकडे वळला? तर दुसरा दुखावला, राष्ट्रवादीत बंडाची चाहूल!

Mamata Banerjee Exit Poll Reaction : ममता बॅनर्जींचा मोठा दावा! 'एक्झिट पोल्स' पुन्हा एकदा फेल ठरणार; तृणमूल काँग्रेसला मिळणार 226 पेक्षा जास्त जागा

SCROLL FOR NEXT