Nagpanchami will not be held for the first time
Nagpanchami will not be held for the first time 
कोल्हापूर

50 वर्षांत प्रथमच होणार नाही नागपंचमी...

सकाळवृत्तसेवा

चंदगड : ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथे 50 वर्षे राबविण्यात येणारा नागपंचमीचा उत्सव यावर्षी रद्द करण्यात आला आहे. गौराई शिक्षण मंडळाचे (कोलीक) अध्यक्ष डॉ. नितीन चौगुले व उपाध्यक्ष तानाजी वाघमारे यांनी ही माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कार्यक्रम करण्यास शासनाने मज्जाव केल्याने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. 

सर्पमित्र (कै.) बाबूराव टक्केकर यांनी 1966 मध्ये नागपंचमीनिमित्त गावात पहिले सर्प प्रदर्शन भरविले. सापांची शास्त्रीय माहिती देऊन नागरिकांच्या मनातील गैरसमज दूर करणे हा उद्देश ठेवून 50 वर्षे ते सुरू आहे. शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी सर्पोद्यान सुरू केले. त्याला नॅशनल झू ऍथॉरिटीची मान्यता आहे. या माध्यमातून शाळेतील प्रत्येक विद्यार्थी साप हाताळण्याचे शास्त्रशुद्ध ज्ञान घेतो. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे शिक्षण देणारी या विभागातील ही अनोखी शाळा म्हणून राष्ट्रीय पातळीवर गौरव झाला आहे. 

महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, तमिळनाडू येथील पोलिस, सैन्य दल, वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना येथे प्रशिक्षण दिले जाते. सध्या या सर्पोद्यानाची जबाबदारी तानाजी वाघमारे यांच्याकडे आहे. दरम्यान, नागपंचमीला सर्प प्रदर्शनासाठी चंदगड, आजरा, गडहिंग्लजसह सीमा भागातील नागरिक गावाला भेट देत असत. मात्र, यावर्षी हा कार्यक्रम रद्द केला असून, संचालक मंडळाकडून दिलगिरी व्यक्त केली आहे. कोरोनातून बाहेर पडल्यावर पुढील वर्षीपासून मात्र हे प्रदर्शन पुन्हा नव्या उमेदीने भरविले जाईल, असे कळविण्यात आले आहे. 

दृष्टिक्षेप 
- 1966 मध्ये गावात पहिले सर्प प्रदर्शन 
- शिक्षण संस्थेतर्फे ढोलगरवाडीत सर्पोद्यान सुरू 
- नॅशनल झू ऍथॉरिटीची मान्यता 
- प्रत्येक विद्यार्थ्याला साप हाताळण्याचे शास्त्रशुद्ध ज्ञान 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT