Nanibai chikhali house electricity bill Question of in the assembly 
कोल्हापूर

नानीबाई चिखलीचा प्रश्‍न विधानसभेत घुमला; फडणवीस यांनी केली विचारणा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कागल तालुक्‍यातील नानीबाई चिखली येथील जनाबाई मगर यांना महावितरणने पाठविलेल्या बिलासंदर्भात विधानसभेत प्रश्न उपस्थित झाला. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे महापुरात घर पडले असताना व वीज मीटर बंद असताना बिल पाठवले जातेच कसे, अशी विचारणा केली होती. त्यावर राज्यातील बिल देण्याची अव्हरेज पद्धत बंद करायला हवी, असे विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले.


वाढीव बिलासंदर्भात राज्यातील वीज ग्राहकांत असंतोष आहे. कोरोना काळातील वीज बिले माफ करावीत, अशी मागणी सातत्याने होत आहे. त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने आंदोलने, निदर्शने होत आहेत. यासंदर्भात फडणवीस यांनी सभागृहाचे लक्ष वेधताना नानीबाई चिखली येथील जनाबाई मगर यांचे घर महापुरात पडले असताना व वीज मीटर बंद असताना त्यांना बिल पाठविल्याचा विषय उपस्थित केला. त्यावर पटोले यांनी अव्हरेज बिल देण्याची पद्धत बंद व्हायला हवी. अन्यथा हा विषय सातत्याने चर्चेत येईल, असे स्पष्ट केले.


याबाबत भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे म्हणाले, ‘मगर यांना फेब्रुवारी ते जूनपर्यंत प्रतिमहिना बावीस युनिट गृहीत धरून बिल पाठविण्यात आले 
आहे. खरेतर त्यांचे घर गेल्यावर्षी महापुरात पडले गेले. तरीही या कुटुंबाने आलेले एक हजार चाळीस रुपये बिल भरले. ते भरून घेताना त्यांना याबाबत कोठे बोलायचे नाही, असे धमकावण्यात आले. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देत आहे. मात्र, राज्यातील मगर यांच्यासारख्या  शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही, हे दुर्दैवी आहे.’

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs Pakistan Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान आशिया कप लढत! रेकॉर्ड्स, स्टॅट्स आणि संभाव्य विजेता कोण?

मोठी बातमी! विभक्त रेशनकार्डधारक सूना ‘लाडकी बहीण’साठी पात्र; पडताळणीचा अहवाल शासनाला सादर, पण ४ लाखांवर लाभार्थी पत्त्यावर सापडल्याच नाहीत

आजचे राशिभविष्य - 14 सप्टेंबर 2025

साप्ताहिक राशिभविष्य : (१४ सप्टेंबर २०२५ ते १९ सप्टेंबर २०२५)

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 14 सप्टेंबर 2025

SCROLL FOR NEXT