National Crime Records esakal
कोल्हापूर

National Crime Records : 'त्या' क्षणी कोणाशी तरी बोला..; जीवन संपवणे हा पर्याय नव्हे!

देशात सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात (Maharashtra) घडत असल्याचे भयावह चित्र समोर आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

आत्महत्येमागे नैराश्य मोठे कारण दिसून येते. नैराश्येमुळे स्वतःचे जीवन संपवण्याशिवाय आराम मिळवण्याचा दुसरा मार्ग दिसत नाही.

-गौरव डोंगरे

कोल्हापूर : भविष्यातील आर्थिक अडचणीच्या नैराश्येतून शहरात सुधाकरनगर येथील नीरज विकास सरगडे (वय २३) याने फरशी कापण्याच्या ग्राईंडर कटरने स्वतःचा गळा चिरून घेऊन आत्महत्या केली. तर नाशिकमध्ये पोलिस निरीक्षक अशोक निवृत्ती नजन (वय ४८) यांनी पोलिस ठाण्यात (Police Station) सर्व्हिस रिव्हॉल्वरने गोळी झाडून घेत जीवन संपवले.

देशात सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात (Maharashtra) घडत असल्याचे भयावह चित्र समोर आले आहे. आत्महत्येच्या विचारातील व्यक्तीने एका क्षणासाठी कोणाशी तरी मनमोकळा संवाद झाल्यास समस्येवर तोडगा निघू शकतो व काही प्रमाणात आत्महत्येच्या विचाराला बगल मिळू शकते, असे तज्ज्ञ सांगतात.

अभियांत्रिकीच्या (Engineering) तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणारा नीरज हा आई आणि आजोबांसोबत आजोळी राहत होता. भविष्यात आर्थिक अडचण आल्यास शिक्षण, लग्न, मुलाबाळांचे पालनपोषण आपण कसे करणार, अशा नैराश्‍‍येने त्याला ग्रासले होते. तर दुसरीकडे चांगली नोकरी असूनही पोलिस अधिकाऱ्याने टोकाचा निर्णय घेतला.

मागील दहा वर्षांत १५ ते २५ वयोगटांतील तरुणांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्डनुसार २०२२ मध्ये एक लाख ७० हजार ९२४ आत्महत्यांची नोंद झाली आहे. लोक आत्महत्या का करतात? टोकाचे पाऊल उचलण्यामागे नेमके कोणते कारण असावे? आत्महत्येचे विचार येण्यामागे नैराश्य, वाढत्या अपेक्षा यासह अनेक कारणे यातून पुढे आली आहेत.

विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च वाढत आहे. त्यामुळे पालक दिवस-रात्र कामाच्या मागे धावतात. यामध्ये काही गैर नाही. पण, मुलांकडे काही काळ दुर्लक्ष होते. मुलाच्या वागण्यातील बदल, विचारलेल्‍या प्रश्‍नांमध्ये त्याची टाळाटाळ, मित्र, परिवार याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. बोलणे कमी झालेला, एकटा राहणारा आपला पाल्य कोणत्यातरी नैराश्येकडे गेला नाही ना? याकडे पालकांनी पाहणे आणि त्याच्याशी संवाद साधणे गरजेचे.

-डॉ. भारत नाईक, समुपदेशन, मानसशास्त्र विभाग प्रमुख, महावीर, महाविद्यालय

भारतात आत्महत्या (नॅशनल क्राईम रेकॉर्ड नुसार)

  • २०१८ १ लाख ३४ हजार ५१६

  • २०१९ १ लाख ३९ हजार १२३

  • २०२० १ लाख ५३ हजार ०५२

  • २०२१ १ लाख ६४ हजार ०३३

  • २०२२ १ लाख ७० हजार ९२४

आत्महत्येचा विचार कशामुळे येतो?

आत्महत्येमागे नैराश्य मोठे कारण दिसून येते. नैराश्येमुळे स्वतःचे जीवन संपवण्याशिवाय आराम मिळवण्याचा दुसरा मार्ग दिसत नाही. हा धोका विशेषतः पुरुषांसाठी जास्त असतो. व्यक्तीचा हताशपणा जितका जास्त असेल तितकीच त्यांच्या आत्महत्येचा प्रयत्नाची मानसिकता वाढेल. शारीरिक किंवा मानसिक आजार, सामाजिक चिंता, जोडीदार गमावणे, विभक्त होणे किंवा घटस्फोट घेणे, अशा कारणांमुळे एखादी व्यक्ती हताश होऊन आत्महत्येचे विचार येऊ शकतो.

सर्वांत कमी आत्महत्या उत्तर प्रदेशात

देशभराच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या झाल्याची नोंद आहे. २०२२ मध्ये झालेल्या एकूण आत्महत्यांपैकी महाराष्ट्र (१३.३ टक्के), तामिळनाडू (११.०६ टक्के), मध्य प्रदेश (९ टक्के), कर्नाटक (८ टक्के), पश्चिम बंगाल (७.४ टक्के) त्या तुलनेत सर्वात कमी आत्महत्या उत्तरप्रदेशात (४.८ टक्के) झाल्याचे दिसते.

लोकांचे मनमोकळे बोलणे काहीसे कमी झाल्याचे दिसून येते. एकटेपणा जाणवल्यास आई-वडिलांशी, पत्नीशी, मित्रांशी, सहकाऱ्यांशी बोलले पाहिजे. एकटे राहणारा एका वेगळ्याच जगात वावरू लागतो. त्यामुळे त्याचे विचारही बदलत जातात. संवाद साधल्याने कोणतेही नुकसान नसून केवळ फायदाच होतो.

-डॉ. पवन खोत, मानसोपचार विभाग प्रमुख, सीपीआर

आत्महत्येची कारणे

  • प्रेमप्रकरण - ४.५ टक्के

  • बेरोजगारी - १.९ टक्के

  • दारूच्या नशेत - ६.८ टक्के

  • कौंटुंबिक वाद - ३१.७ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटनेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT