National football players ganesha date story in kolhapur 
कोल्हापूर

फुटबॉलची किक सीमेवर हिट ; देशसेवेसाठी तो सीमेवर उभा...

सुयोग घाटगे

कोल्हापूर : उणे २० अंश सेल्सिअसचे तापमान, रक्त गोठवणारी थंडी, रात्रीच्या अंधारात चांदण्याच्या प्रकाशामुळे उजळून निघालेले बर्फाचे आच्छादन आणि सीमेवरील खडा पहारा, अशा या वातावरणात कोल्हापूरचा गणेश खंबीर उभा आहे. राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू अशी ओळख असणारा गणेश सुकुमार दाते वयाच्या २५ व्या वर्षी देशसेवेसाठी सीमेवर उभा आहे. 


 भारत आणि पाकिस्तान या दोन देशांतील संघर्ष आणि त्यामुळे निर्माण होणारी तणावाची स्थिती कायम आहे. त्यातच सध्या सीमेवर चिनी सैन्याकडून सुरु असणाऱ्या कुरापतींमुळे भारत आणि चीन या देशांतील तणाव वाढले आहेत. कोल्हापूरचा उमदा तरुण फुटबॉल खेळाडू अतिसंवेदनशील मानल्या जाणाऱ्या जम्मू-काश्‍मीर येथील राजुरी सेक्‍टर इथे तैनात आहे. पुलवामा हल्ल्यानंतर हा भाग सर्वाधिक संवेदनशील झाला आहे. संपूर्ण परिसर बर्फाने आच्छादलेला आहे. 

तीन फुटांहूनही अधिक बर्फाच्या आच्छादनातून वाट काढावी लागते. येथील हवामान उणे २० अंश सेल्सियस इतके आहे, तर २४ तासांमध्ये ३ ते ४ तासांची विश्रांती येथील जवानांना मिळते. असे असताना देशसेवेसाठी हे जवान रोजच जीव धोक्‍यात घालून संपूर्ण देशाच्या सुरक्षेसाठी तत्पर आहेत. गणेश दाते याने प्राथमिक शिक्षण महाराष्ट्र हायस्कूलमधून पूर्ण केले तर राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांत खेळताना १९ वर्षांखालील गटात त्याचा सहभाग होता. यानंतर त्याने दिलबहार तालीम, कोल्हापूर पोलिस संघातून उत्कृष्ट खेळ केला.

 मुंबई स्थित संघातही त्याने खेळ केला आहे. त्यातच पोलिस भरतीतील त्याच्या प्रयत्नाला अवघ्या दोन गुणांनी हुलकावणी दिली. या नंतर लगेचच त्याने हैदराबाद येथे सैन्य भरतीत सहभाग घेतला. येथे यश प्राप्त करून त्याने सैन्य दलाच्या तीन वर्षाच्या सेवेत वैष्णोदेवी, पुलवामासारख्या संवेदनशील ठिकाणी देशसेवा केली आहे. जरग गल्ली, मंगळवार पेठ येथे त्याचे आई- वडील राहतात. वडील सुकुमार दाते  सिक्‍युरिटी गार्ड म्हणून 
काम करतात.

देशाची सेवा करावी, आपल्या अंगावर वर्दी असावी, असे गणेशचे नेहमीच स्वप्न होते. हे स्वप्न तो जगतो आहे. सैन्यभरतीला गेलेला गणेश अजूनही घरी परतलेला नाही. कधी तरीच फोनवर बोलणे होते. या व्यतिरिक्त संपर्क साधणे शक्‍य होत नाही.
- सुकुमार दाते, वडील
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Human Story : भावा हे कोल्हापूर आहे ! महावीर जयंतीनिमीत्त मराठा समाजातील व्यक्तीने जैन समाजाला केली कोट्यावधींची जमीन दान; असा आहे जिव्हाळा

Karad Chemical: तासवडेत स्फाेटांची मालिका सुरूच; केमिकल कंपनीत कॅन फुटून स्फाेट, ‘प्रदूषण’चे निरीक्षण!

Latest Marathi News Live Update : अंजनगावात शिवरायांच्या पुतळ्यावरून तणाव! दोन समाज आमनेसामने

त्यांना चालता येत नव्हतं... शेवटच्या दिवसांत अशी झालेली विक्रम गोखलेंची अवस्था; मराठी अभिनेत्री म्हणाली, 'त्यांच्या पोटात...'

Wife Rights India : पतीच्या मृत्यूनंतरही पत्नीला मिळते पोटगी, हायकोर्टाचा मोठा निर्णय; नेमकं काय आहे प्रकरण ?

SCROLL FOR NEXT