Nationalist Congress Party President Jayant Patil criticism for  Former Chief Minister and Leader of Opposition Devendra Fadnavis
Nationalist Congress Party President Jayant Patil criticism for Former Chief Minister and Leader of Opposition Devendra Fadnavis 
कोल्हापूर

"भाजप विरोधात जाणाऱ्यांवर 'ईडी' अटळ" 

सुनील पाटील

कोल्हापूर : भाजपकडून केवळ सुडबुध्दीचे राजकारण केले जाते. भाजपकडून देशहितापेक्षा सुड भावनेचीच प्रवृत्ती बाळगली जाते. कारण, भाजपच्या विरोधात जाणाऱ्यांमागे "ईडी'ची चौकशी लावली जाते, अशी टिका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आज केली. कोल्हापूर येथे एका खासगी कार्यक्रमासाठी आले असता ते बोलत होते. 

 पाटील म्हणाले, भाजप विरोधात कोणत्याही नेत्यांनी जावून चालत नाही. त्यांच्यामागे ईडी लावली जाते. एकनाथ खडसे यांनाही अशाच पध्दतीने नोटीस पाठवली आहे. मात्र, या नोटीसीची भिती बाळगायची गरज नाही. मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणूकीत पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यासंदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही.

पक्षाच्या बैठकीतच हा निर्णय घेतला जाईल. मराठा समाजाने काळजी करण्याचे कारण नाही. न्यायालया टिकेल असेच मराठा समाजाचे आरक्षण असल्याचेही श्री पाटील यांनी सांगितले. राज्यात निधी वाटपामध्ये दुजाभाव होत असल्याचा विरोधकांचा गैरसमज आहे. कोरोनामुळे निधी वाटपता काही अंशी मागे-पुढे झाले असेल पण, भविष्यात सर्वांना अपेक्षीत आणि समान निधी वाटप होईल, यात कोणीही शंका बाळगायचे कारण नसल्याचेही  पाटील यांनी सांगितले. 

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

SCROLL FOR NEXT