navratri festival Devotees do not entry to the Ambabai temple kolhapur 
कोल्हापूर

यंदाचा नवरात्रोत्सव नियमांनुसारच : अंबाबाई मंदिरात भाविकांना प्रवेश नाहीच

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर :  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाचा नवरात्रोत्सव शासनाने जाहीर केलेल्या नियमांनुसारच होणार आहे. केवळ मोजक्‍याच लोकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी होतील. भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नसल्याची माहिती आज पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली.  


शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर देवस्थान समितीच्या मुख्य कार्यालयात पूर्वतयारीसाठी विविध बैठका झाल्या. पोलिस प्रशासन, महावितरण, महापालिका मालमत्ता विभाग, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, दूरसंचार विभाग, श्रीपूजक, सेवेकरी, सुरक्षा पुरविणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. त्यानंतर श्री. जाधव यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘मंदिरातील वीज, पाणीपुरवठा असेल किंवा मंदिर परिसरातील खड्डे बुजविण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या आहेत.’’   

हेही वाचा- तरूणांनो सावधान! 2200 रुपयांत फिल्ड ऑफिसरची नियुक्ती पत्रे -
देवस्थान समितीचे सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव, वाहतूक निरीक्षक वसंत बाबर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे प्रसाद संकपाळ, समितीच्या उपसचिव शीतल इंगवले, अभियंता सुदेश देशपांडे, सुयश पाटील, मंदिर व्यवस्थापक धनाजी जाधव, मिलिंद घेवारी आदी उपस्थित होते. दरम्यान, उद्या (ता. ८) श्री छत्रपती देवस्थान ट्रस्ट आणि टाकाळा व शाहू मिल परिसरातील विविध संस्था, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठका होणार आहेत. 

चारही दरवाजांची स्वच्छता
अंबाबाई मंदिरात सोमवारपासून स्वच्छता मोहिमेला प्रारंभ झाला आहे. देवस्थान समितीचे कर्मचारीच यंदा मोहीम राबवत आहेत. शिखरांवरील सर्व स्वच्छता पूर्ण झाली असून, आज मंदिराच्या चारही दरवाजांची स्वच्छता झाली. सोमवारी (ता. १२) गाभाऱ्याची स्वच्छता होणार असल्याचे मंदिर व्यवस्थापक जाधव यांनी सांगितले. 

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam : राज्यसेवा मुख्य परीक्षा अखेर पुढे ढकलली; स्थापत्य अभियांत्रिकी, गट-ब मुख्य परीक्षेलाही स्थगिती

Karad News : कऱ्हाड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; पृथ्वीराज चव्हाण यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

Karad News : पुणे-बंगळुरू महामार्गावरून कऱ्हाड शहरात येण्यासाठी नवीन ४० फुटी मार्ग

Vani News : सप्तशृंगी-वणी गड घाट रस्ता तीन दिवस रस्ता कामासाठी बंद...

वयाच्या ५२ व्या वर्षीही थलपती विजय इतके फिट कसे? इडली अन् अंड्यांपासून मटण बिर्याणीपर्यंत; पाहा त्यांचा डाएट प्लॅन!

SCROLL FOR NEXT