navratri festival jyotiba temple will be open tomorrow night 
कोल्हापूर

दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाचा उद्या होणार जागर ; पाच पाकळी सोहन कमळ पुष्पातील महापूजा

निवास मोटे

जोतिबा डोंगर (कोल्हापूर) : श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर ता.पन्हाळा येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाचा उद्या ( ता. २३ ) जागर होणार असून या निमित्ताने मंदिर रात्रभर खूले असणार आहे . देवाचा जागर असल्याने मंदिरात भजन किर्तन व धार्मीक कार्यक्रम होतील . जोतिबा जागराचे वैशिष्टये असे आहे की , जोतिबाचा जागर झाल्याशिवाय इतर शक्ती देवतांचा जागर होत नाही . जोतिबाच्या जागर सोहळ्याला मोठे पारंपारीक महत्व आहे .
 दरम्यान , आज शारदीय नवरात्र उत्सवातील सहाव्या  दिवशी जोतिबा देवाची सकाळी पाच पाकळी सोहन कमळा पुष्पातील महापूजा बांधण्यात आली. ही पूजा समस्त दहा गावकर व पुजारी यांनी बांधली . चोपडाईदेवी, यमाईदेवीची यांच्या कमळ पुष्पातील महापूजा बांधण्यात आल्या  .

दरम्यान ,आज सकाळी दहा वाजता मानाचा उंट  घोडा सर्व देव सेवक यांच्या उपस्थिती मध्ये धूपारतीचा सोहळा ढोल ,पिपाणी, सनई यांच्या गजरात मूळमाया श्रीयमाई मंदिराकडे गेला.
यावेळी देवस्थानचे अधिक्षक महादेव हिंडे श्रीचे पूजारी ग्रामस्थ उपस्थीत होते . सकाळी  हा सोहळा ज्योतिबा मंदिर ते मुख्य पायरी रस्ता मेन पेठ सेंटर प्लाझा या मार्गावरून गज गतीने गेला. या वेळी गावातील सुवासिनी महिलांनी सडा रांगोळी काढून या सोहळ्याचे स्वागत केले.

या सोहळ्यात सहभागी असणाऱ्यांना काही ग्रामस्थांनी सुगंधी दुधाचे वाटप केले. यमाई मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी बारा वाजता हा सोहळा पुन्हा मुख्य मंदिरात आला. त्यावेळी  प्रवीण डबाणे यांनी तोफेची सलामी दिली. व या सोहळ्याची सांगता झाली. डोंगरावर भाविकांना येण्यास बंदी आहे . तरी ही डोंगराच्या पायथ्यापर्यंत भाविक येतात . पोलीसांनी नाका बंदी केल्याने तेथूनच येणारे भाविक हात जोडून माघारी परतात . उद्या मात्र डोंगरावर जादा पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे .

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : पुणे पोलिसांनी मारणे टोळीच्या गुंडाच्या आवळल्या मुसक्या; भाजप कार्यकर्त्याला मारहाणीनंतर ९ महिने होता फरार

Solapur News: 'संपर्कप्रमुख कोकिळांवर धावून गेले शिवसैनिक'; साेलापुरातील शिवसेना (उबाठा) बैठकीत राडा, नेमकं काय घडलं..

राष्ट्रवादीच्या कार्यालयात लावणी प्रकरणी शहराध्यक्षांना नोटीस, नृत्य करणाऱ्या महिलेनं म्हटलं, चुकीचं काहीच नाही

Sharad Pawar: शरद पवारांच्या बैठकीला तीन आमदारांची दांडी; आगामी निवडणुका सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडी म्हणून लढणार

'तिने जाणून बुजून किसिंगचे 37 रिटेक घेतले.' कार्तिक आर्यन किसिंग करुन वैतागलेला, शुट संपताच म्हटला...' झालं बाबा एकदाचं'

SCROLL FOR NEXT