navratri festival special story by nandini narewadi 
कोल्हापूर

कोल्हापूर नवदुर्गा स्पेशल : कोकमच्या पानांपासून बनवला मालवणी ब्रॅंड ; आणि तिने ४० महिलांना बनविले ‘आत्मनिर्भर’

नंदिनी नरेवाडी

कोल्हापूर :  कोणताही व्यवसाय म्हटल, की भांडवलाची चिंता लागून राहते. जाधव पार्कातील श्रद्धा संतोष लाड यांनी मात्र चार कोकमच्या पानांपासून केलेली सुरवात अल्प गुंतवणुकीद्वारे मोठा व्यवसाय उभा केला आहे. घरगुती पद्धतीने त्यांनी कोकम सरबत बनविले आणि केवळ गुणवत्तेच्या जोरावर हा व्यवसाय विस्तारला. सध्या कोणतीही गुंतवणूक न करता फक्त व्यवहारचातुर्यातून शहरातील ४० महिला कोकम सरबताच्या विक्रीतून ‘आत्मनिर्भर’ बनल्या आहेत.

श्रद्धा यांना घरात कोकम सरबत बनविण्याची इच्छा झाली आणि त्यांनी बनविलेल्या त्या कोकमचा एकेक घोट घरातील प्रत्येकाला गोड करून गेला. एक-दोन वेळाच घेतलेल्या या कोकम सरबताची चव पुढे शेजारी, पाजारी आणि आप्तेष्टांनाही आवडू लागली आणि  हाच कोकम सरबत व्यावसायिक दृष्टिकोनातून बनविला तर यात यश नक्की मिळेल, असा विश्‍वास त्यांना मिळाला. कल्पकता, व्यवहारचातुर्य, व्यवस्थापन या गुणवैशिष्ट्यांच्या बळावर बनविलेला घरगुती कोकम सरबताने मालवणी ब्रॅंड म्हणून लौकिकही मिळवला.

सुमारे या चाळीस महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी श्रद्धा यांनी अनोखी युक्‍ती वापरली आहे. कोकम सरबत थंड असेल तरच कडक उन्हात त्याची मागणी वाढते. ही सहज मार्केटची गरज त्यांनी ओळखली. ज्यांना एका जागी बसून व्यवसाय करण्याची इच्छा आहे, अशा महिलांना त्यांनी सरबत विक्रीची कल्पना सुचवली. त्यांच्यासाठी आईस बॉक्‍स, आईस ट्रे दिले. कोकम सरबतही पुरवला. ‘रेडी टू ड्रींक’ असलेल्या या सरबतातून ठराविक रक्कमही त्यांना दिली. विना गुंतवणूक, विना भांडवल या युक्तीतून रोजगार मिळाल्याने या महिला कोरोना संकटाच्या काळातही चरितार्थ चालविला. शहरातील ठिकठिकाणी तयार कोकम सरबत घेऊन बसलेल्या महिला पाहावयास मिळतात.

अवघ्या १० रुपयांत मिळणाऱ्या कोकम सरबताचे आरोग्यदायी फायदेही पटवून सांगतात. पावसाळा वगळता इतर महिने कोकम सरबताची विक्री सुरू राहते. एकदा बनविलेला सरबत सलग आठ दिवस फ्रीजमध्ये टिकून राहतो. त्यामुळे नुकसानीची भीती राहत नाही. शहरातील महिलांनी त्यांच्या व्यवसायात रुची दाखवून स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम केले आहे.
सरबताचे इतर फ्लेवरही कोकम सरबताची मागणी जशी वाढली तशी सरबताचे इतरही फ्लेवर त्यांनी बाजारात आणले. पायनापल, मॅंगो, आँरेज व आवळा अशा फ्लेवरच्या सरबतही खवय्यांच्या पसंतीस पडत आहेत.

कोकम आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने तसेच उन्हात गारवा देत असल्याने कोकम सरबत विकण्याचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला. सुरवातीला घरच्या घरीच सरबत बनवत होते. जसजशी मागणी वाढली तशी विना गुंतवणूक महिलांना सरबत विक्रीसाठी दिल्यानंतर ४० महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत.
- श्रद्धा लाड.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Cash Withdrawal: आता कॅशसाठी एटीएममध्ये जाण्याची गरज पडणार नाही, स्कॅन करताच रोख रक्कम हातात येईल, पण कसं?

IND vs PAK, Asia Cup: भारतानं हस्तांदोलन टाळलं, पण पाकिस्तानची कारवाई आपल्याच अधिकाऱ्यावर; पदावरूनच केलं बडतर्फ

Latest Marathi News Updates : वंजारा-बंजारा एक आहे, या धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक

Saurabh Bharadwaj Challenge SuryaKumar Yadav : ‘आप’चे नेते सौरभ भारद्वाज यांचं सूर्यकुमार यादवला चॅलेंज अन् टोमणेही मारले!

Bathing Tips for Good Health: स्वच्छतेसोबत आरोग्यही जपा – आंघोळ करताना फॉलो करा या महत्त्वाच्या टिप्स!

SCROLL FOR NEXT