ambabai  sakal
कोल्हापूर

Navratri Festival : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची सुवर्ण पालखी झळाळली

नित्य व उत्सव काळातील सोन्याच्या दागिन्यांचीही स्वच्छता

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - शारदीय नवरात्रोत्सवासाठी करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या नित्य व उत्सव काळातील सोन्याच्या जडावी दागिन्यांची स्वच्छता रविवारी करण्यात आली. देवीसाठी बनवलेली सोन्याची पालखीही स्वच्छतेनंतर झळाळली. रविवारी दिवसभर गरूड मंडप येथे दागिन्यांची स्वच्छता सुरू राहिल्याने सुरक्षायंत्रणा कडक केली होती.

साडेतीन पीठापैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात नऊ दिवस देवीची विविध रूपांत जडावी सालंकृत पूजा बांधण्यात येते. तसेच देवीसाठी नित्यालंकारासह नवरात्र काळात उत्सवासाठी महत्त्वाचे पारंपरिक दागिने देवीला परिधान केले जातात.यामध्ये किरीट, कुंडले, चिंचपेटी, मंगळसूत्र, नेकलेस, ७ पदरी कंठी, ढोकळा हार, मोत्याची माळ, नवग्रह हार, पुतळ्याची माळ, साज, लफ्फा, कमरपट्टा, मुकुट, पाऊल, चंद्रहार, पोहेहार, बोरमाळ, ठुशी, नथ, गदा यासह इतर आभूषणांचा समावेश आहे. या सर्व सोने दागिन्यांची मंदिरातील परंपरागत कारागिरांनी स्वच्छता केली. सहा ते सात तास ही स्वच्छता मोहीम सुरू होती.

नवरात्रकाळात दररोज रात्री साडेनऊ वाजता अंबाबाईची पालखी मिरवणूक काढण्यात येते. ललितापंचमीदिवशी अंबाबाई त्र्यंबोली भेटीसाठी टेंबलाई टेकडीवरील मंदिरात पालखीतून जाते. अष्टमीदिवशी देवीची पालखी नगरप्रदक्षिणा काढण्यात येते. यासाठी अंबाबाईसाठी सोन्याची पालखी घडवली आहे. पालखीची स्वच्छता व पॉलिश करण्याचे काम रविवारी करण्यात आले. दरम्यान, मंदिराच्या चारही दरवाज्यांची, मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली.

भाविकांना दर्शनासाठी आज मंदिर बंद

अंबाबाई मंदिरातील गाभाऱ्याची स्वच्छता बुधवारी करण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांतर्फे दिवसभर मंदिराच्या आतील भाग अत्याधुनिक यंत्रणेच्या सहाय्याने स्वच्छ करण्यात येणार आहे. त्यामुळे सोमवारी (ता. ९) अंबाबाई मंदिरात भाविकांना दर्शनासाठी प्रवेश बंद ठेवण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT