Jyotiba-Dongar-Crowd sakal
कोल्हापूर

Navratrotsav 2024 : जोतिबा डोंगरावर भाविकांची विक्रमी गर्दी; महिला भाविकांची संख्या लक्षणीय

श्री दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या दर्शनासाठी महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील भाविक येत आहेत. आज रविवार व चौथी माळ असल्याने गर्दीने डोंगर खचाखच भरला.

निवास मोटे

जोतिबा डोंगर - येथील श्री दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या दर्शनासाठी महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील भाविक येत आहेत. आज रविवार व चौथी माळ असल्याने गर्दीने डोंगर खचाखच भरला. चांगभलच्या जयघोषाने डोंगर दुमदुमला.

आज करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन पर राज्यातील भाविकांच्या झुंडीच्या झुंडी डोंगरावर आल्या. यामध्ये महिला भाविकांची संख्या लक्षणीय होती. आज नवरात्र उत्सवातील चौथा दिवस त्यामुळे मंदीरातील समईमध्ये तेल घालण्यासाठी या भाविकांनी मोठी गर्दी केली. तसेच काहीनी कडाकण्या अर्पण केल्या.

आज दिवसभर कडक उन्हात भाविकांच्या झुंडी डोंगरावर येत राहिल्या. रात्री उशिरापर्यंत भाविकांची मोठी गर्दी डोंगरावर होती. भाविकांच्या सुरक्षेसाठी कोडोली पोलीस ठाणेचा बंदोबस्त होता. साहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग फौजदार मनोज कदम हे दिवसभर डोंगरावर गर्दीवर नियंत्रण ठेवून होते. आज सकाळी दहा वाजता मूळ माया यमाई मंदीराकडे सवाद्य मिरवणूकीने धुपारती सोहळा गेला.

यावेळी देवस्थानचे अधिक्षक धैर्यशील तिवले सिंदीया देवस्थानचे अधिक्षक अजित झूगर पुजारी ग्रामस्थ सर्व देवसेवक उपस्थित होते. धुपारती सोहळ्याचे गावातील सुहासिनी महिलांनी पंचारतीने स्वागत केले तसेच यावेळी सुगंधी दुधाचे वाटप करण्यात आले.

दुपारी बारा वाजता धुपारती आरती सोहळा मुख्य मंदिरात आल्यानंतर प्रविण डबाणे यांनी तोफेची सलामी दिली. येत्या गुरुवारी जोतिबा देवाचा जागर सोहळा होणार असून या दिवशी मंदिर दर्शनासाठी दिवस रात्र खुले राहील. तसेच मंदिरात विविध धार्मिक विधी तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच येत्या शनिवारी जोतिबा देवाचा पहिला पालखी सोहळा सुरू होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhirendra Shastri: धीरेंद्र शास्त्रींचं आव्हान श्याम मानव यांनी स्वीकारलं; पण 'या' मुद्द्यावरुन एकमत होईना

Shaktipith Highway : ​‘शक्तिपीठ’ महामार्गाचा धनदांडग्यांनाच फायदा, शेतकऱ्यांचे मात्र 'पीठ' होणार; नव्या आरेखनाविरोधात शेतकरी आक्रमक

जहाजाचे दोन मालक, एक म्हणतो पाकिस्तानला चला, दुसरा म्हणतो भारतात; अहवाल सीमाशुल्ककडे सोपवला, काय होणार?

Gokul Milk Union Administrator : ‘गोकुळ’ प्रशासक नियुक्ती हाच अंतिम पर्याय, राजकीय मतप्रवाहात; गोकुळच्या दुधात मिठाचा खडा कोणाचा...

Electricity Bill Saving Tips : हवं तेवढं वापरा फॅन, एसी, फ्रीज! पण वीजबिल येणार निम्मं; वापरुन पाहा 'ही' एकदम सोपी ट्रिक

SCROLL FOR NEXT