Minister Hasan Mushrif esakal
कोल्हापूर

Hasan Mushrif : '1998 मध्ये हसन मुश्रीफांना अनेकांचा विरोध होता, तरीही उमेदवारी दिली'; रोहित पवारांवर पलटवार

पुण्यामध्ये तरी सगळेच खासदार आणि आमदार आमचे कुठे निवडून आले आहेत?

सकाळ डिजिटल टीम

'शरद पवार हे आमचे नेते होते. त्यांच्यामुळेच राजकारणात आम्हाला स्थान मिळालेले आहे, हे आम्ही कधीच नाकारत नाही.'

कोल्हापूर : राष्ट्रवादीने २०१४ मध्ये भाजपला बाहेरून पाठिंबा दिला. २०१७ लाही तेच आणि २०१९ ला काय घडलं ते तुम्ही पाहिले. या घडामोडी केल्या नसत्या तर आजची ही परिस्थिती घडलीच नसती, असे स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी दिले.

मुंबईत पत्रकारांशी ते बोलत होते. कोल्हापुरातील आमदार रोहित पवार यांच्या वक्तव्यावर मुश्रीफ म्हणाले, ‘माझ्यावर आरोप करायला जागाच नसल्यामुळे असल्या बारीक -सारीक गोष्टी ते शोधत आहेत. १९९८ मध्ये हसन मुश्रीफ यांना अनेकांचा विरोध होता. तरीही, उमेदवारी दिली.

मुश्रीफांच्या नेतृत्वाखाली पक्ष वाढला नाही रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या टीकेवर ते म्हणाले, ‘त्यावेळी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या नेतृत्वाखालीच मी लढलो. मग, विरोध कोणाचा होता? पुण्यामध्ये तरी सगळेच खासदार आणि आमदार आमचे कुठे निवडून आले आहेत? तिथे आमचे दोन-तीनच आमदार आले होते. निवडणुका त्या-त्या वेळच्या परिस्थिती आणि वातावरणावर अवलंबून असतात.’

खासदार शरद पवार यांच्या जाहिराती आणि पोस्टरवर ‘बाप तो बाप रहेगा’ असे लिहले आहे. याबद्दल पवार हे आमचे नेते होते. त्यांच्यामुळेच राजकारणात आम्हाला स्थान मिळालेले आहे, हे आम्ही कधीच नाकारत नाही. ते आमचे दैवत आहेत आणि असतील, असेही मुश्रीफ म्हणाले.

पत्रकारांनी कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये जाऊन कारखानदारांच्या मुलाखती घ्याव्यात. त्यानंतर मुश्रीफ यांची दहशत आहे की नाही. आजमितिला तिथे एक इंचही जागा शिल्लक नाही. एवढे उद्योग वाढलेले आहेत. प्रश्न राहतो नोकऱ्यांचा. पंचतारांकित एम.आय.डी.सी. साठी जमीनी गेलेल्या भूमिपुत्रांच्या नोकऱ्यांसाठी लोकप्रतिनिधी या नात्याने मी आग्रही राहणारच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT