Rohini Khadse esakal
कोल्हापूर

दुर्गेचं रूप घेवून 'भ्रष्ट जुमला पार्टी'ला सत्तेतून खाली खेचून हिशोब पूर्ण करा; रोहिणी खडसेंचं महिलांना आवाहन

आमचे विठठ्ल असलेल्या शरद पवार यांच्या भोवतीचा बडव्यांचा गराडा बाजूला गेला आहे.

सकाळ डिजिटल टीम

प्रत्येक गोष्टींचा एक काळ असतो. कदाचित आमच्यासाठी सध्या संघर्षाचा काळ असावा, लवकरच राष्ट्रवादीला नक्की चांगले दिवस येतील’, असा विश्वास अॅड. रोहिणी खडसे यांनी व्यक्त केला.

कोल्हापूर : ‘देशात महागाई, बेरोजगारी वाढविण्याचे काम भाजपने (BJP) केले आहे. दुर्गेचे रूप घेवून आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत ‘भ्रष्ट जुमला पार्टी’ ला सत्तेतून खाली खेचून हिशोब पूर्ण करा. महिला सक्षमीकरणाला बळ देणाऱ्या शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या पाठीशी राहा’, असे आवाहन ‘राष्ट्रवादी’च्या प्रदेशाध्यक्ष ॲड. रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी येथे केले.

येथील जिल्हा परिषद सोसायटीच्या सभागृहात राष्ट्रवादी (शरद पवार गट) तर्फे आयोजित महिला कार्यकर्ते यांच्‍या मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, आर. के. पोवार, प्रा. कविता म्हेत्रे प्रमुख उपस्थित होत्या.

प्रा. म्हेत्रे म्हणाल्या, ‘आमचे विठठ्ल असलेल्या शरद पवार यांच्या भोवतीचा बडव्यांचा गराडा बाजूला गेला आहे. लाभार्थी, ठेकेदार हे अजित पवार मित्र मंडळात गेले आहेत.’ या मेळाव्यात वैशाली पाटील यांच्या ‘रेश्‍माचे धागे’ पुस्तकाचे प्रकाशन झाले. जिजाऊ पुरस्कार मिळाल्याबद्दल शहराध्यक्ष पद्मजा तिवले यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हाध्यक्षा अश्‍विनी माने, स्नेहा देसाई, सुचिता पडवळ, आदींनी मनोगत व्यक्त केले.

‘राष्ट्रवादी’ला लवकरच चांगले दिवस

प्रत्येक गोष्टींचा एक काळ असतो. कदाचित आमच्यासाठी सध्या संघर्षाचा काळ असावा, लवकरच राष्ट्रवादीला नक्की चांगले दिवस येतील’, असा आम्हाला विश्वास असल्याचे अॅड. रोहिणी खडसे यांनी आज येथे सांगितले. कोल्हापुरात महिला कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baby Trafficking Case: चार वेळा विकलेले एक महिन्याचे बाळ तेलंगणमधून परत ताब्यात; संभाजीनगर पोलिसांनी बाळ विक्री रॅकेटचा पर्दाफाश

Uttarakhand: उत्तरकाशीत पावसाचे थैमान; ८० ट्रेकर्सची सुटका, उर्वरितांच्या बचावासाठी बचावासाठी ८ हेलिकॉप्टर्स मैदानात video viral

Marathi News Live Updates: दुष्काळाने ऊसही कडू केला; दिवाळी तोंडावर असताना महिला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, जनावरांच्या चाऱ्यासाठी उभा ऊस विकण्याची वेळ

Oppo K14 Plus 5G स्मार्टफोन लाँच; 144Hz AMOLED डिस्प्ले आणि 45W फास्ट चार्जिंगचा धुमाकूळ! पहा किंमत...

Childhood Cancer Symptoms : मुलाला येणारा ताप केवळ सामान्य ताप नसू शकतो; पालकांनी 'या' धोक्याच्या घंटा कधी ओळखाव्या? तज्ज्ञांनी दिला गंभीर आजाराचा इशारा

SCROLL FOR NEXT