NDRF 
कोल्हापूर

कोल्हापुरात होणार ‘एनडीआरएफ’ चा कॅम्प

जागाही निश्‍चित ः कोल्हापूरसह सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी नियोजन

निवास चौगले

कोल्हापूर : महापुरासारख्या (Flood) आपत्तीत पुरात अडकलेल्या लोकांना तत्काळ मदत मिळावी, त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवता यावे यासाठी कोल्हापुरात ‘एनडीआरएफ’ चा (Kolhapur NDRF) कायमस्वरूपी कॅम्प होणार आहे. या कॅम्पसाठी जागाही निश्‍चित झाली असून सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर याचा सविस्तर अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठवण्यात येणार आहे. कोल्हापूरसह सांगली, सिंधुदुर्ग व रत्नागिरी (Sangli Ratnagiri Sindhudurg)या चार जिल्ह्यासाठी हा कॅम्प असेल.

गेल्या दोन वर्षापासून कोल्हापूरसह सांगली जिल्ह्याला महापुराचा मोठा तडाखा बसत आहे. नद्यांचे पाणी शहरातील नागरी वस्तीसह नदीकाठच्या गावांतील अनेकांच्या घरात घुसते. अशा परिस्थिती नागरीकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे जोखीमीचे काम कमी वेळेत करावे लागते. स्थानिक पातळीवर हे काम प्रभावीपणे होत नाही, त्यात अत्याधुनिक साहित्यांच्या अभावामुळे या कामावर अनेक मर्यादा येतात. यासाठी हे काम प्रभावीपणे व्हावे, लोकांना हलवताना कोणतीही दुर्घटना होऊन यासाठी महाराष्ट्रात केंद्रीय गृह मंत्रालयाच्यावतीने एनडीआरएफचा मुख्य कॅम्प पुणे येथे कार्यरत आहे. या पथकातील जवानांना महापुराबरोबरच जमीनीचे भूस्खलन, इमारत दुर्घटना घडल्यानंतर त्याखाली अडकलेल्या लोकांची सुटका करण्याचेही काम करावे लागते.

सद्या महाराष्ट्रसाठी या पथकात प्रत्येकी ४५ जवान असलेल्या १२ टीम कार्यरत आहेत. यापैकी एक पथक विदर्भासाठी नागपूर येथे, तीन पथके मुंबईत तर उर्वरित पथके पुण्यात आहेत. पुणे वगळता कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यात महापूर किंवा इमारत दुर्घटना, भूस्खल होऊन त्याखाली गांवे गाडली गेल्यास तातडीने मदत मिळणे अशक्य आहे. या पथकाला पुण्याहून बोलवावे लागते. पुण्याहून पथक आल्यानंतर त्यांना घेऊन येणाऱ्या हेलिकॉप्टर किंवा विमानाला उतरण्यासाठी कधी कधी जागा मिळत नाही.

या पार्श्‍वभुमीवर एक कायमस्वरूपी कॅम्पच कोल्हापुरात होण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी एनडीआरएफकडूनच जागेची मागणी झाल्याचे समजते. जिल्हा प्रशासनाने यासाठी एक जागाही निश्‍चित केली असून त्याच्या कागदपत्रांची छाननी पूर्ण झाल्यानंतर हा प्रस्ताव केंद्रीय गृह मंत्रालयाला पाठवण्यात येणार आहे. या कॅम्पसाठी पथकातील बोटीसह इतर आवश्‍यक साहित्य ठेवण्यासाठी मोठे गोडावून, प्रशिक्षणासाठी मोठे मैदान व पथकातील जवानांच्या निवासस्थानाचीही सोय करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया दिर्घकालीन असली तरी गेल्या दोन महापुराचा अनुभव लक्षात घेता प्रशासनाकडून याचा तातडीने पाठपुरावा करण्याचे नियोजन आहे.

आयआरबीच्या धर्तींवर कॅम्प

कोल्हापूरसह पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे वगळता अन्य जिल्ह्यात जातीय किंवा अन्य कारणांनी दंगल झाल्यास त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी भारत राखीव बटालियनचा (आयआरबी) एक कॅम्प सद्या कोल्हापुरात सुरू झाला आहे. नंदवाळ (ता. करवीर) येथे या कॅम्पसाठी जागा देण्यात आली असून याठिकाणी जवानांच्या निवासस्थानासह प्रशिक्षण केंद्रच्या उभारणीचे काम सुरू आहे. त्याच धर्तीवर एनडीआरएफचा कॅम्प कोल्हापुरात होणार आहे.

सद्या सहा पथके कार्यरत

जिल्ह्यातील महापूर ओसरून नद्यांचे पाणी पात्रात गेले असले तरी एनडीआरएफची सहा पथके सद्या जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. यापैकी दोन पथके अनुक्रमे शिरोळ व हातकणंगले तालुक्यात तर उर्वरित पथकांचा मुक्काम करवीरसह कसबा बावडा येथे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT