need for color of jyotiba temple peaks
need for color of jyotiba temple peaks 
कोल्हापूर

का केली जाते पावसाळ्या पूर्वी जोतिबा मंदिराच्या शिखरांची रंगरंगोटी?

निवास मोटे

जोतिबा डोंगर - जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथील श्री दख्खनचा राजा जोतिबा देवालयाच्या शिखरांची रंगरंगोटी यंदा कोरोनाच्या कारणामुळे झाली नाही. तरीसुध्दा पावसाळ्यापूर्वी ही शिखरे रंगविणे गरजेचे कारण येथील पावसाळी हवामान खराब असते. सतत पावसाची रिपरिप दाट धुके यांचा सामना या शिखरांना करावा लागतो. परिणामी पावसाचे पाणी शिखरातून आत मंदिरां मध्ये येते. त्यामुळे दरवर्षी चैत्र यात्रेपूर्वी या शिखरांची रंगरंगोटी जाते. 

दरवर्षी पावसाळी हवामानामुळे दाट धुके जोरदार पाऊसामुळे  शिखरांवर सर्रास शेवाळ साठते. छोट्या वनस्पतीही उगवून येतात. त्यामुळे दरवर्षी ही सर्व शिखरे स्वच्छ करून त्यावर रंगरंगोटी करण्याची पारंपरिक पद्धत डोंगराव आहे.

महादेव (बद्रीकेदार ) चोपडाईदेवी व श्री जोतिबा देव अशा या तीन मंदिरांचा समूह असून या तिन्ही मंदिराची शिखरे उंच असून शिखरावर चढ-उतार करण्याचे काम अवघड आहे. वरती चढताना दोर लावूनच या शिखरांवर चढावे लागते. मोठ्या दोराच्या साह्यानेच ही शिखरे रंगवावी लागतात. गेल्या पंचवीस वर्षापासून ही शिखरे रंगरंगोटी करण्याचे काम कसबा बावडा रमण मळा येथील अनिल अधिक करतात. आठ दहा दिवसात ही सर्व शिखरे रंगवून पूर्ण होतात. पूर्ण काळजीपूर्वक हे काम करावे लागते. उन्हांमुळे मंदिरावरील दगड तपतो परिणामी पायाला चटके बसतात. त्यामुळे रंगरंगोटी ही सकाळी लवकर व दुपारनंतर करावी लागते. वंशपरंपरेनुसार शिखरावर ध्वज (पताका ) लावण्याचे काम छत्रे भावकीकडे  आहे. या भावकीतील सर्व लोकांना मंदिरा शिखरावर ध्वज लावण्याची कला अवगत आहे. भाविकांनी देईल त्या दक्षिणेवर ते समाधान मानतात.  

दरम्यान,  ही शिखरे दरवर्षी स्वच्छ केल्यामुळे त्यास ऑइल पेंट कलर केल्यामुळे त्यास वर्षभर काही होत नाही. फक्त पावसामुळे रंग जातो. 
रंगरंगोटी केलेली शिखरे ही आकर्षक दिसतात. त्यामुळे मंदिराला शोभा येते.  यंदा कोरोना विषाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी गेल्या  दिड महिन्यापासून डोंगरावर शांतता आहे. मंदिराचे दरवाजेही बंद असून केवळ पुजारी वर्गाला प्रवेश दिला जातो. यंदा चैत्र यात्रा भाविकांविना पार पडली. डोंगर गुलालमय झालाच नाही.निदान मंदिराच्या सुरक्षतेसाठी शिखरांची रंगरंगोटी पावसाळ्या पूर्वी करणे अवश्यक आहे. अशी मागणी ग्रामस्थ पूजारी भाविक यांच्यातून होत आहे.

जोतिबा मंदिरांची शिखरांची रंगरंगोटी करण्याबाबत विचार विनीमय सुरू असून देवस्थान समितीच्या कोल्हापूर कार्यालयातून आदेश आल्यावर हे काम सुरू करण्यात येणार आहे.  

-महादेव दिंडे, अधिक्षक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती जोतिबा कार्यालय.


जोतिबा शिखरांची रंगरंगोटी दर वर्षी करणे गरजेचे कारण जोतिबा येथील हवामान त्यास कारणीभूत आहे. पावसाळयात तर पूर्ण शिखरे शेवाळमय होतात.
-अश्विनी रामाणे, माजी महापौर कोल्हापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT