कोल्हापूर

...त्यासाठी कबनूर नगरपरिषद होणे आवश्‍यक

रवींद्र पाटील

कबनूर : इचलकरंजी या वस्त्रनगरीच्या परिणामाने कबनूरचे औद्योगीकरण मोठ्या प्रमाणात झाले. साहजिकच कबनूरची लोकवस्ती प्रचंड प्रमाणात वाढली. कबनूरची लोकवस्ती इतकी वाढली की कबनूरलगत असणारी गावे शहापूर, तारदाळ, कोरोची, तिळवणी, रुई, चंदूर, इचलकरंजी या गावांच्या सीमेपर्यंत कबनूरची लोकवस्ती झाली. त्यामुळे या गावांची लोकवस्ती कोठे संपते व इतर गावांची कुठे सुरू होते. कबनूरमधील चंदूर रस्ता भागाकडील औद्योगीकरण इतक्‍या मोठ्या प्रमाणात झाले आहे की ते एक स्वतंत्र औद्योगिक वसाहतच वाटते. 

कबनूरचा वाढत्या लोकवस्तीमुळे नागरी सुविधांवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक मूलभूत सुविधा देण्यामध्ये ग्रामपंचायतीला मर्यादा पडताहेत. साहजिकच नागरिकांना मूलभूत सुविधांचे अनेक प्रश्न भेडसावत आहेत. प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. स्वच्छ व मुबलक पाणी मिळणे अशक्‍य झाले आहे. वाढत्या लोकवस्तीमुळे पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरली आहे. पाच ते सहा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जातो. त्यातही पाणीपुरवठा योजनेवरील विद्युत पंप नादुरूस्त झाला तर 10 ते 12 दिवसांनी पाणी येते. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी ससेहोलपट होते. 

वाढत्या लोकवस्तीमुळे गावातील स्वच्छतेचा प्रश्न आहे. गावात कचऱ्याचे ढीग, तुंबलेल्या गटारी यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. साथीच्या रोगाचा कबनूरमधील नागरिकांना फटका बसतो. एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या कबनूरमध्ये फक्त एकच आरोग्य उपकेंद्र आहे. हे उपकेंद्र म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था आहे. येथे शासकीय रुग्णालयाची आवश्‍यकता आहे. नगरपरिषदेशिवाय शासकीय रुग्णालय होणे अशक्‍य आहे. एकूणच अनेक सुविधांसाठी कबनूर नगरपरिषद होणे आवश्‍यक झाले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Final, RCB vs GT live: गतविजेत्या बंगळुरूने इतिहास रचला! मुंबई इंडियन्सचा १३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, बनला पहिला संघ...

SEBI म्युच्युअल फंड आणि डीमॅट नॉमिनेशनचे नियम बदलणार! सप्टेंबरपूर्वी पूर्ण करा 'हे' महत्त्वाचे काम

IPL 2026 Final, RCB vs GT live: वादग्रस्त निर्णयाने जीवदान मिळालेला वॉशिंग्टन नडला; गुजरातला सावरले, बंगळुरूसमोर ठिकठाक लक्ष्य

IPL 2026 Final, RCB vs GT live: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा मोठा पराक्रम, मोडला मुंबई इंडियन्सचा विक्रम...

नेपाळनेही भारतीय जमीन बळकावली, पंतप्रधान बालेन शाह यांचे मोठे विधान, लिपुलेख-कालापानी वाद पुन्हा चर्चेत!

SCROLL FOR NEXT