कोल्हापूर

सीईटी परीक्षा केंद्र बदलण्याची संधी हवी 

सकाळवृत्तसेवा

गडहिंग्लज : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव असणाऱ्या बहुतांश भागातून विद्यार्थी आपापल्या गावाकडे परतले आहेत. त्यातच कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. त्यामुळे जुलैमध्ये होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी केंद्र बदलण्याची संधी या विद्यार्थ्यांना हवी आहे. विद्यार्थी राहत असलेल्या तालुक्‍यातच परीक्षा केंद्र करावे, अशी मागणी पालकांची आहे. या व्यवस्थेमुळे विद्यार्थी आणि पालकांचा परीक्षेसाठी प्रवासाचा ताण कमी होऊन फिजिकल डिस्टन्स राखणे शक्‍य होणार आहे. 

राज्यातील एमएचटी-सीईटी परीक्षा 4 जुलैपासून 5 ऑगस्टपर्यंत होणार आहे. गेल्या दोन महिन्यांत असणारी सुटी आणि महाराष्ट्रातील वाढणारा कोरोनाचा प्रादुर्भाव यामुळे मुंबई, पुणे, लातूर, नांदेड, औरंगाबाद या विभागांतून अनेक विद्यार्थी आपापल्या मूळ गावी परतले. कोल्हापूर, सांगली, सातारासह राज्यभरातील विविध ग्रामीण भागात हे विद्यार्थी आले आहेत. या विद्यार्थ्यांनी आपापल्या महाविद्यालयांतून सीईटीसाठी अर्ज केले आहेत. आता मात्र हे विद्यार्थी नाईलाजाने आपापल्या गावी परतले आहेत. 

पुन्हा सीईटी परीक्षेसाठी आपल्या शहरात परतण्याची या विद्यार्थ्यांची सध्या मानसिकता नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्याची संधी हवी आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा केंद्र बदलण्याची संधी सीईटी सेलने सुरू करावी, अशी पालकांची मागणी आहे. मुख्यत्वे कोव्हिड 19 साथीच्या काळात अनावश्‍यक प्रवास टाळणे शक्‍य होईल. खास करून विद्यार्थी राहात असलेल्या तालुक्‍यातच परीक्षा केंद्राची सोय झाल्यास चांगलेच होणार आहे. यातूनच काही थोड्या विद्यार्थ्यांना सीईटी आणि प्रवेश परीक्षा (JEE -MAIN, NATA, NEET) इत्यादी तारखांबाबत गोंधळ झाल्यास अशांना ऑगस्टमध्ये परीक्षेची संधी देण्याची मागणीही पालकांची आहे. 

पालक शिक्षण संघातर्फे मागणी
कोरोनामुळे बहुतांश मोठ्या शहरातून आपापल्या मूळ गावी परतलेल्या विद्यार्थ्यांना ते राहात असलेल्या परिसरात सीईटी परीक्षा केंद्र देण्याबाबत विद्यार्थी आणि पालकांतून मागणी वाढली आहे. याबाबत इचलकरंजी पालक शिक्षण संघातर्फे ई-मेलद्वारे सीईटी सेलकडे मागणी केली आहे. सेलने याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा. 
- प्रा. अजित पाटील, समुपदेशक, अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया, कोल्हापूर. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained: चंद्रामागे काय घडलं? Nasa च्या आर्टेमिस II मोहिमेदरम्यान ४० मिनिटे पूर्ण संपर्क गायब

IPL News: ‘इम्पॅक्ट प्लेयर’मुळे परिणाम; दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाज जेमिसनची टीका

World Health Day 2026: जागतिक आरोग्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या महत्त्व, इतिहास आणि यंदाची थीम

Mumbai local Train News: जीवघेण्या लोकल गर्दीत आता १०० कंत्राटी फेरीवाले; मध्य रेल्वेचा धोकादायक प्रयोग!

Sports News: ६१ वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ संपवणार?; आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा ; लक्ष्य, सिंधूवर भारताची मदार

SCROLL FOR NEXT