Need to start a health center in Dajipur 
कोल्हापूर

दाजीपुरातील आरोग्य केंद्र सुरू होणे गरजेचे 

सकाळवृत्तसेवा

राधानगरी : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्यसुविधा वाढविण्यावर शासनाने भर दिला असताना दाजीपुरातील प्राथमिक आरोग्य केंद्रातून वैद्यकीय सेवा सुरू करण्याची निकड अधोरेखित झाली आहे. निदान या आणीबाणीच्या व गरजेच्या काळाची सेवा सुरु होण्याची अरण्यवासीयांना अपेक्षा आहे. 

वैद्यकीय सेवेपासून वर्षानुवर्षे उपेक्षित राहिलेल्या अभयारण्य क्षेत्रातील 30 हून अधिक वाड्यावस्त्यातील कुटुंबांना सक्षम वैद्यकीय सेवा देण्यासाठी आरोग्य केंद्राची योजना प्रस्तावित आहे. आरोग्य केंद्रासाठी तब्बल कोटभर रुपये खर्च खर्चून नवीन अद्यावत सर्व सुविधायुक्त इमारतीची वर्षभरापूर्वीच उभारणी झाली आहे. मात्र, वैद्यकीय यंत्रणाच नसल्याने आरोग्य केंद्र कुलूप बंद आहे .तर हजारो लोकांची वैद्यकीय सेवेपासून परवडच सुरू आहे .केवळ वेळीच डॉक्‍टरांसह आरोग्य कर्मचारी पदनिर्मिती प्रस्ताव आणि वैद्यकीय साधनासाठी जिल्हा नियोजन मंडळातून आर्थिक तरतूदी अभावी ही बिकट स्थिती उद्‌भवली आहे. 

पदनिर्मिती प्रस्ताव मंजुरी व आर्थिक तरतूद प्रश्न मार्गी लावण्याची आयती संधी कोरोनामुळे आली आहे. वैद्यकीय सुविधेसाठी शासनाकडून प्राधान्याने आर्थिक निधीची उपलब्धता सुरू आहे .अशावेळी लोकप्रतिनिधीनी या आरोग्य केंद्रातून वैद्यकीय सेवेची निकड शासनाला निदर्शनास आणल्यास वैद्यकीय यंत्रणेचा अभाव दूर होणार आहे. 

तत्काळ कार्यवाहीची गरज 
"कोरोना'मुळे मुंबई-पुण्याहून गावाकडे परतलेल्या चाकरमान्यांची पश्‍चिम भागातच अधिक संख्या आहे. त्यातच या भागात खाजगी वैद्यकीय सेवाही मिळत नाही. यामुळे दाजीपुरातील प्राथमिक आरोग्य केंद्रातून अशा वेळीच वैद्यकीय सेवा सुरू करण्यासाठी गरज असून तत्काळ कार्यवाहीची गरज आहे. 

पदनिर्मिती प्रस्ताव आर्थिक निधी मंजूरीस झालेल्या दिरंगाईने या आरोग्य केंद्रातून वैद्यकीय सेवा मिळत नाही. पंचायत समितीने ठरावाद्वारे मागणी करूनही यंत्रणेचे दुर्लक्ष सुरू आहे. किमान आता कोरोनाच्या संकटात तरी प्राधान्याने वैद्यकीय यंत्रणा उभी करावी. 
- मोहन पाटील, सदस्य पंचायत समिती, राधानगरी 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्र महिला आयोगाच्या पुढील अध्यक्षा कोण? दोन दमदार महिला नेत्यांची नावे समोर, नव्या चेहऱ्यांबाबत मोठी माहिती समोर

IPL 2026 Marathi News: महेंद्रसिंग धोनी पूर्णपणे तंदुरुस्त नाही? Video ने वाढवली चिंता; इरफान म्हणाला तसा, ही Dhoniची शेवटची IPL

लग्नाच्या वेळी जितके पैसे खर्च केले ते केले नसते तर... अमृता खानविलकरचं वक्तव्य चर्चेत, म्हणते- हिमांशू आणि मी...

Kolhapur : जिल्हा परिषद विषय समिती फॉर्म्युला ठरला; शिवसेनेला बांधकाम- आरोग्य, तर जनसुराज्यला शिक्षण-अर्थ

तुंबाडची मंजुळा सिनेमा दिग्गज कलाकारांची मांदियाळी ! अनोखी कल्पना वापरत उलगडली कास्ट

SCROLL FOR NEXT