Neeri survey definite reduction in air pollution in the city 
कोल्हापूर

कोळसा, डिझेल नको; पण एल. पी. जी वाढवा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर :  शहरातील वायू प्रदूषण कमी होण्यासाठी निरी (नॅशनल एन्व्हायर्न्मेंट इंजिनिअरिंग रिसर्च इिन्स्टट्यटू) संस्थेने विस्तृत अहवाल दिला आहे. या अहवालात शहरातील हवा प्रदूषण करणारे घटक कोणते, त्यांचे प्रमाण किती आणि २०२१ सालापर्यंत ती किती कमी करणे आवश्‍यक आहे, याचा लेखाजोखाही मांडला आहे. याकडे प्रशासन आणि नागरिकांनी गांभीर्याने पाहिल्यास शहरातील हवा प्रदूषणात खात्रीशीर घट होईल.

अल्हाददायक आणि स्वच्छ वातावरण ही कोल्हापूर शहराची एकेकाळची ओळख होती. आता हेच शहर देशातील १०२ प्रदूषित शहरांच्या यादीत आले आहे. शहरात हवेचे प्रदूषण कशामुळे वाढते याचे सर्वेक्षण निरी संस्थेने केले. त्यांनी काढलेले निष्कर्ष विचार करायला लावणारे आहेत. या अहवालात रस्त्यांच्या डांबरी करणावर भर दिला आहे. कारण रस्त्यावरील धुरळा हवेत मिसळल्याने हवेचे प्रदूषण अधिक होते.

तसेच शहरामध्ये सी.एन.जी आणि एल.पी.जी यांचा वापर २०२१ पर्यंत ५९ टक्के केले पाहिजे, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. २०१८ साली ते २२ टक्के होते. शहरामध्ये मोठे मॉल, गृहप्रकल्पही अधिक आहेत. त्यांचे डिझेलवर चालणारे इन्व्हर्टरही प्रदूषणात भर टाकतात. त्याचाही प्रतिबंध करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. यासह अन्य घटकांचाही समावेश अहवालात आहे. मात्र, याची अंमलबजावणी झाल्यास शहरातील हवा प्रदूषणात निश्‍चित घट होईल अशी खात्री पर्यावरण अभ्यासक देतात. 

वायू प्रदूषण कमी करण्यासाठी निरीने दिलेले उद्दिष्ट 
मुद्दा    २०१८ ची स्थिती    २०२१ चे उिद्दष्ट 
हवेतील प्रदूषके    ६ टन प्रती दिन    ३.५८ प्रती दिन 
शहरातील कोळशाचा वापर    ५ टक्के    १ टक्के
एल.पी.जी, सी.एन.जी वापर    २२ टक्के    ५९ टक्के 
पक्के रस्ते    ७७२ किमी    १०० किमी वाढ

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT