negative report for this youth who travel corona positive patient  
कोल्हापूर

"त्या' तरूणाचा अहवाल निगेटीव्ह ; कोरोनाबाधित महिलेसोबत केला होता प्रवास 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - कसबा बावडा येथील मराठा कॉलनीतील कोरोनाचा अहवाला पॉझीटीव्ह आलेल्या महिलेसोबत सातारा ते कोल्हापूर असा प्रवास केलेल्या करवीर तालुक्‍यातील खटांगळे येथील तरूणाचा कोरोनाचा अहवाल आज निगेटीव्ह आला. या रूग्णवाहिकेची माहिती वृत्तपत्रात आल्यानंतर स्वतःहून हा तरूण दोन दिवसांपुर्वी सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल झाला होता. 

मराठा कॉलनीतील 63 वर्षीय महिलेने सातारा ते कोल्हापूर असा रूग्णवाहिकेतून प्रवास केला होता. 28 मार्च रोजी ही महिला कोल्हापुरात आल्यानंतर 3 एप्रिल रोजी तिच्यात कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने तिला सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले होते. 6 एप्रिल रोजी या महिलेचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आला. यासंदर्भातील बातम्या वृत्तपत्रात प्रसिध्द झाल्यानंतर याच रूग्णवाहिकेतून सातारा ते कोल्हापूर या महिलेसोबत केलेला खटांगळे ता. करवीर येथील तरूण स्वतःहून दोन दिवसांपुर्वी सीपीआरमध्ये दाखल झाला होता. त्याचा स्वॅब तपासणीसाठी मिरजेला पाठवण्यात आला होता. आज त्याचा अहवाला निगेटीव्ह आला. 

आज उचत (ता. शाहुवाडी) येथील एका तरूणाचा अहवाल पॉझीटीव्ह आल्यानंतर खळबळ उडालेल्या घटनेने या तरूणाचा अहवाल पॉझीटीव्ह आल्यानंतर सुटकेचा निश्‍वाःस टाकला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Pune Expressway Accident: सूर्योदय पाहून परतताना क्षणात सर्व संपलं… मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघातात IIT च्या तीन विद्यार्थ्यांचा अंत

US Visa Bond Policy : डोनाल्ड ट्रम्प यांचा ५० देशांना दणका ! व्हिसा बाँड केला अनिवार्य, नेमकं काय आहे प्रकरण ?

Dharashiv:धाराशिवमध्ये गुढीपाडव्याला म्हशी-रेड्यांच्या शर्यतीचा थरार; परंपरेचा जल्लोष

Chhatrapati Sambhajinagar: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घरखरेदीचा उत्साह; २५० गृहप्रवेशासह बाजारात तेजी

विद्यापीठाचा मोठा निर्णय! 'सीसीटीव्ही' असलेल्या कॉलेजमध्येच आता परीक्षा केंद्र; ‘लॉ’ची परीक्षा त्याच महाविद्यालयात, २ एप्रिलपासून परीक्षा, वाचा...

SCROLL FOR NEXT