new 10 coronaviras casein kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापूरमध्ये सोमवारी सकाळीच आणखी १० कोरोना बाधित...

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : सोमवारी सकाळी जिल्ह्यात आणखी 10 रुग्णांची भर पडली आहे त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या आता 2274 वर जाऊन पोहोचली आहे दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 55 जणांचा बळी गेला असून इचलकरंजी येथे आज सकाळी पुन्हा एका मृत व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे त्यामुळे बळींची संख्या आता 56 वर पोहोचली आहे.


जिल्ह्यात या महिन्यात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेषतः हातकणंगले तालुक्यात अनेक गावात रुग्ण वाढू लागले आहेत. आज सकाळी आलेल्या अहवालात एकूण दहा रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यामध्ये राधानगरी तालुक्यातील तीन, हातकणंगले तालुक्यातील दोन, कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील चार तर करवीर तालुक्यातील एका रुग्णांचा समावेश आहे. या दहा रुग्णांच्या मुळे आता जिल्ह्यातील रुग्ण संख्या 2274 वर जाऊन पोहोचली आहे.


 दरम्यान सतत वाढत असणारे रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर आज पासून जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन सुरू झाला आहे. पोलीस आणि प्रशासनाने अत्यंत काटेकोरपणे बंदोबस्त ठेवला असून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांच्या वर तातडीने कारवाई सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व रस्ते आत्ता ठप्प झाले आहेत.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs PBKS Live: इडन गार्डनवर मुसळधार पाऊस... ५-५ षटकांची होणार मॅच, जाणून घ्या cut-off time, लाईव्ह अपडेट्स

Pune News : समाविष्ट गावांसाठी बांधकाम परवानग्यांना ६० दिवसांची मर्यादा; नगरविकास विभागाचे आदेश

Baramati Election: मोरेंना मैदानात उतरवून काँग्रेसला काय साधायचंय? महत्त्वाची 5 कारणं समजून घ्या...

ताटातली चपातीही महागली; गव्हाच्या दरात किलोमागे दोन ते तीन रुपयांची वाढ, कारण काय?

Property Tax : मिळकतकर थकबाकीदारांना पायघड्या; दंडामध्ये ५० टक्के कपात करण्याचा प्रस्ताव

SCROLL FOR NEXT