new 219 corona positive case in kolhapur district 
कोल्हापूर

ब्रेकिंग - कोल्हापुरात आज सायंकाळपर्यंतच तीनशेचा अकडा पार 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - कोरोनाबाधितांच्या संख्येत आज सायंकाळपर्यंत नव्या ३०४  रूग्णांची वाढ झाली. त्यामुले जिल्ह्यातील एकूण कोरोना रूग्णांची संख्या आता तीन हजार ६४७ वर पोहोचली आहे. तर करोना मुक्त झालेल्यांची संख्या एक हजार १०९ झाली आहे. सध्या दोन हजार १४६ जणांवर उपचार सुरू असून, त्यातील २८ जणांची प्रकृती गंभीर आहे. अशातच जिल्ह्यात बेडची संख्या कमी पडू लागल्याने उपचार कोठे करावेत, असा पेच निर्माण झाला. त्याने चिंतेत आणखी भर पडत आहे.   

दुपारपर्यंत पाॅझिटिव्ह आलेल्या रूग्णांमध्ये कोल्हापूर शहर अकरा. त्यामध्ये शास्त्रीनगर-4, एक हॉस्टिपटल-1, शहर-2, राजोपाध्यनगर-1, रंकाळा -1, मुक्त सैनिक वसाहत-1, मार्केट यार्ड-1. 

करवीर तालुका दहा. त्यामध्ये प्रयाग चिखली-3 , निगवे दुमाला-1, केर्ली-1, नंदवाळ-1, वाकरे-3, 
निगवे खालसा-1. 

हातकणंगले तालुका सहा. त्यामध्ये भेंडवडे-1, कारंडे मळा-1 
शिरोली पुलाची-2, नदीवेश नाका (इचलकरंजी)-1, इचलकरंजी-1. 

शिरोळ तालुका नऊ, त्यामध्ये शिरोळ-1, गौरवाड-1, 
शिरदवाड-1, यड्राव-1, कवठेसार-2, कुरूंदवाड-1, शिरढोण-1 
कोथळी-1. 

भुदरगड तालुका एक. त्यामध्ये गारगोटी-1, पन्हाळा तालुका सोळा. त्यामध्ये पोर्ले-1, पडळ-1, वागबीळ-1, कोतोली-10, हळदी- 1 
यवलूज-1, मानेवाडी-1. 

गडहिंग्लज तालुका अकरा. त्यामध्ये हडलगे-1, महागाव-1, 
गडहिंग्लज-2, शेंड्री-1, हलकर्णी-6.

चंदगड तालुका एक. जथ्थेवाडी-1. तर राधानगरी तालुका  
राही येथील एकाचा समावेश आहे. 


शिरोलीत तिघांचे अहवाल पाॅझिटिव्ह

आज शिरोलीत कोरोनाचा शिरकाव झाला असून, तीघांचे रिपोर्ट पॉझीटव्ह आलेत. त्यामुळे गावात खळबळ उडाली असून, चौकशीसाठी ग्रामपंचायत व आरोग्य केंद्रातील फोन खणाखणात आहेत. 

शिरोलीच्या चारही बाजूच्या गावात कोरोना बाधीत रूग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे ; मात्र जिल्हयात सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या शिरोलीत आजपर्यंत एक ही स्थानिक रूग्ण आढळला नव्हता. यामुळे शिरोली ग्रामपंचायत व दक्षता समितीच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत असताना, आज  दुपारी आलेल्या अहवालात शिरोलीतील तीघांचे रिपोर्ट पॉझीटव्ह आले. यापैकी एक शिर्डी येथून प्रवास करून आला आहे. एक जण कोल्हापूरातील खासगी हॉस्पीटलमध्ये कामास आहे, तर रूईकर कॉलनीतील बाधीत रुग्णाच्या संपर्कातील एकाचा रिपोर्ट पॉझीटव्ह आला आहे. 


या तीघांचा पत्ता शोधून, त्यांच्या संपर्कातील लोकांची माहिती घेण्याचे काम ग्रामपंचायत व आरोग्य विभागाकडून सुरु आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रवाशाने VIDEO केला म्हणून वाचला TTE, तिकीट मागताच तरुणीने स्वत:चे कपडे फाडले; धावत्या ट्रेनमध्ये घातला गोंधळ

‘आधी स्वतःकडे पाहा!’ कतरिनाच्या वाढलेल्या वजनाच्या ट्रोलिंगवर अली जाफरचा संतापला, म्हणाला...

IND W vs BAN W: भारताने टॉस जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय; बांगलादेशविरुद्ध सेमीफायनलसाठी अशी आहे टीम इंडियाची Playing XI

Sardesai Wada in Kasba : छत्रपती संभाजी महाराजांचे महाराष्ट्रातील अखेरचे वास्तव्य असलेला ऐतिहासिक वाडा पडझडीच्या मार्गावर; मुख्यमंत्र्यांकडे संवर्धनासाठी आर्त हाक

Gokul Election 2026 : गोकुळ निवडणुकीत महायुतीचा नवा फॉर्म्युला! 25 नाही तर तब्बल 'इतक्या' जागांसाठी होणार चुरस, काय आहे गणित?

SCROLL FOR NEXT