new 26 corona patient found in karvir kolhapur total count in 593 
कोल्हापूर

कोल्हापूरमध्ये आणखी २६ जणांना कोरोनाची बाधा....

निवास चौगुले

कोल्हापूर : आज सकाळी आलेल्या अहवालात  कोल्हापूर शहरातील तब्बल 26 रुग्णांचा समावेश आहे. काल दिवसभर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा कहर सुरूच होता तो आज सकाळी  पुन्हा तसाच राहिला आहे.आज सकाळी आलेल्या अहवालात म्हाडा कॉलनी येथील तब्बल 11 रुग्णांचा समावेश आहे. त्याचबरोबर साळुंखे नगर, मोरेवाडी, लक्षतीर्थ वसाहत, कळंबा, गुलाब गल्ली उत्तरेश्वर पेठ या भागातील रुग्णांचा समावेश आहे. एकाच ठिकाणाहून अधिक रुग्ण येत असल्यामुळे शहरात संसर्ग अधिक प्रमाणात  होत असल्याचे आजच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.


जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत काल उच्चांकी वाढ झाली. काल २४ तासांत ५६७ व्यक्ती बाधित आढळल्या. काल कोरोनाबाधितांची संख्या सात हजार ३१६ इतकी झाली. दिवसभरात १२ कोरोनाबाधितांचे मृत्यू झाले; तर २०५ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या. त्यामुळे कोरोनामुक्तांची संख्या एकूण तीन हजार ६७ इतकी झाली आहे. सध्या एकूण चार हजार ५० आहे .कोरोनाबाधितांवर शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  
तालुकानिहाय बाधित   
कोल्हापूर शहर १५१, हातकणंगले ८०, करवीर ९५, इचलकरंजी ६०, कागल ३५ येथे आज सर्वाधिक बाधितांची नोंद झाली. उर्वरित सर्व तालुक्‍यात कमीत कमी तीन ते जास्तीत जास्त १९ पॉझिटिव्ह आढळले. 

हेही वाचा- इचलकरंजी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार हाजी असलम सय्यद यांच्यावर बलत्काराचा गुन्हा... -
ग्रामीण भागातील प्रमाण वाढले
कोरोनाबाधितांचे प्रमाण ग्रामीण भागात विशेषतः दाटीवाटीच्या भागात जास्त आहे. यात स्थानिक व्यक्तीच कोरोनाबाधित येत असल्याने भीती व्यक्त होत आहे.

तपासणीचा वेग वाढला अन्‌ बाधितांची संख्याही
शेंडा पार्क येथील सूक्ष्मजीव विभागात नवीन आणखी एक स्वॅब तपासणी मशिन बसविण्यात आले. यामुळे आज दिवसभरात स्वॅब तपासणीची संख्या वाढली. गेल्या २४ तासांत ५६७ अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. अद्याप ३०० वर स्वॅब तपासणी होत असून, एकूण ९१२ स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्हचे प्रमाण वाढण्याची शक्‍यता वाढली आहे. 

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT