new 31 corona positive patient found in kolhapur
new 31 corona positive patient found in kolhapur 
कोल्हापूर

ब्रेकिंग - कोल्हापुरात कोरोनाचा कहर सुरूच ; आणखी ३१ जणांना लागण 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - गेल्या बारा दिवसांपासून कोल्हापुरात कोरोना रूग्णांच्या संखेत सातत्याने वाढ होतच आहे. नुकत्याच हाती आलेल्या अवहवालानुसार जिल्ह्यात आणखी ३१ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. या  ३१ रूग्णांसह जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या आता 372 वर पोहोचली आहे.

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


दरम्यान, जिल्ह्यात काल अकराव्या दिवशी ५५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने कोरोना बाधितांची संख्या ३४१ झाली होती. यात शाहूवाडीत मुंबईहून आलेल्या सर्वाधिक म्हणजे १०२ व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या आहेत; तर दिवसभरात ५०९ स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. 

काल दिवसभरात आलेल्या पॉझिटिव्ह अहवालाचे तपशील 

 आजरा ः १, भुदरगड ः २, चंदगड ः ७, कागल ः ४ , राधानगरी ः ५, शाहूवाडी ः ७,  शहर: ४ असे एकूण ३१ पॉझिटिव्ह आले. याशिवाय रात्री उशिरा आणखी २४ पॉझिटिव्ह 
अहवाल आले.

दोन दिवसांतील पॉझिटिव्हपैकी १८ व्यक्तींना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. आज दिवसभरात पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींना ग्रामीण रुग्णालय तसेच तालुकास्तरीय कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले आहे.

जिल्ह्यातील डोंगरी तालुक्‍यातील बहुतेक जण मुंबई, पुण्यात नोकरीला आहेत. तर कागल, इचलकरंजी परिसरातील अनेकांचे जाणे येणे पुणे, सोलापूर येथे आहे. त्यामुळे सोलापूर, मुंबई व पुणे अशा रेड झोनमधून ज्या व्यक्ती कोल्हापुरातील गावी आल्या आहेत. त्यांची तपासणी झाली. त्यानंतर त्यांना गावातील शाळेत, मंदिरात क्वारंटाईन केले. यापैकीच बहुतेकांच्या स्वॅब पॉझिटिव्ह आले. अशा व्यक्तींना त्यांच्या संबंधित क्वारंटाईन कक्षातून सीपीआर तसेच ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: फाफ डू प्लेसिसची फिफ्टी, तर विराटने पुन्हा मिळवली ऑरेंज कॅप

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

SCROLL FOR NEXT