new  314 corona positive cases in kolhapur district
new 314 corona positive cases in kolhapur district 
कोल्हापूर

कोल्हापुरात कोरोनाचा कहर सुरूच ; आज तब्बल एवढ्या नव्या रूग्णांची भर 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - जिल्ह्यात गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 11 जणांचा मृत्यू झाला असून नवे 314 रूग्ण आढळून आले आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेला कोरोनाचा कहर आजही कायम असून मृतात शहरातील चौघांचा समावेश असून नवे 116 रूग्ण आढळून आले आहेत. आजच्या ३१४ नव्या रूग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या 7 हजार 805 पोहोचली आहे. तर आतार्यंत 217 जणांचा मृत्यु झाला आहे. आज 179 रूग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आजअखेर 3449 रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. सद्या चार हजार 362 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. 

आजअखेर कोरोनामुळे जिल्ह्यातील 217 जणांचा मृत्यू झाला आहे. आज शहरातील सदर बाजारातील 67 वर्षीय पुरूष, बागल चौकातील 58 वर्षीय महिला, उत्तरेश्‍वर परिसरातील 66 वर्षीय पुरूष व शनिवार पेठेतील 57 वर्षीय रूग्णाचा मृत्यू झाला. यातील सदर बाजारातील रूग्णांवर खासगी रूग्णालयात तर इतर तीन रूग्णांवर छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अन्य सात मृतात बोरपाडले (ता. पन्हाळा) येथील 22 वर्षीय महिला, मोरेवाडी (ता. करवीर) येथील 67 वर्षीय वृद्ध, इचलकरंजी येथील 70 वर्षीय वृध्द, रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील 60 वर्षीय पुरूष, मुरगुड येथील 72 वर्षीय वृध्द, पाचगांव (ता. करवीर) येथील 70 वर्षीय महिला व इचलकरंजीतील 56 वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

IPL 2024, KKR vs DC Live Score: ऋषभ पंतने जिंकला टॉस! पृथ्वी शॉ-स्टार्कचं पुनरागमन, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT