new 55 corona positive cases in kolhapur district 
कोल्हापूर

मोठी बातमी ; कोल्हापुरात कोरोनाचा धडाका सुरूच ; आणखी ५५ जणांना बाधा 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. काल दिवसभरात ७८ कोरोना बाधितांची नोंद झाल्यानंतर आज दुपारपर्यंत आणखी ५५ रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या आता १६१९ वर पोहचली आहे. त्यामुळे जिल्हावासियांची चिंता वाढली आहे. इचलकरंजीतही कोरोनाने हाहाकार माजवला आहे. तेथे कोरोनाच्या रूग्णांनी दोनशेचा अकडा ओलांडला आहे. 

आज पाॅझिटिव्ह आढळलेल्यांमध्ये पन्हाळा बारा, करवीर नऊ, चंदगड चोवीस, कोल्हापूर शहर पाच तर इचलकरंजीतील चार जणांचा समावेश आहे. यामध्ये सर्वात जास्त चंदगड तालुक्यातील रूग्णांचा समावेश आहे. 


वस्त्रनगरी हादरली  ; द्वीशतक पार

इचलकरंजी शहरातील कोरोना रुग्ण संख्यने आज सकाळीच द्वीशकाचा टप्पा पार केला आहे. काल दिवसभरात तब्बल १५ जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आले होते. आज चार नविन रुग्ण आढळून आले आहेत. सद्या शहरात आतापर्यंत रुग्णांची संख्या २०१ पर्यंत पोहचली आहे.

काल सकाळी श्रीपादनगर, पाटील मळा, केटकाळे गल्ली, टिळक रोड, बंडगर माळ या परिसरातील प्रत्येकी एक रुग्ण आढळून आले. यामध्ये तीन पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. तर काल  सांयकाळी आलेल्या अहवालामध्ये १० पॉझीटीव्ह आले. यामध्ये गणेशनगरमधील यंत्रमाग कारखाना कनेक्शनमधून जवाहरनगरमधील पाचजणांना संसर्ग झाला आहे. या शिवाय आंबेडकरनगर, शास्त्री सोसायटी, थोरात चौक, साईनगर (शहापूर) येथील प्रत्येक एक रुग्ण काल बाधीत झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. आयजीएम रुग्णालयात उपचार घेणार्‍या ७० वर्षाच्या वृध्दालाही कोरोना संसर्ग झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

दरम्यान आज शुक्रवारी आणखी चौघांना संसर्ग झाला. यामध्ये लालनगर, मोठे तळे, षटकोन चौकातील रुग्णांचा समावेश आहे.
यापूर्वी शहरात ठरावीक भागातच रुग्णांची संख्या आढळून येत होती. आज मात्र शहरातील सर्वच भागात रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे भितीचे वातावरण आहे. शहरात तब्बल ५० कंटेन्मेंट झोन झाले आहेत. त्यामुळे ५० टक्क्यापेक्षा जास्त शहर लॉक डाऊन झाले आहे. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुळे मृत्यूची सुरु असलेली मालिका गुरूवारी खंडीत झाली. तर कोरोनामुक्त होणार्‍यांचीही संख्या आता वाढत चालली आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT