New 642 Members On Ration Card In Gadhinglaj Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

गडहिंग्लजमध्ये रेशनकार्डवर नवे 642 सदस्य 

सकाळवृत्तसेवा

गडहिंग्लज : येथील महसूल विभागातर्फे राबविण्यात आलेल्या रेशनकार्डवरील नावे कमी-जास्त करण्याच्या मोहिमेला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. अंत्योदय, प्राधान्य कुटुंब, केसरी आणि शुभ्र कार्डावर एकूण 642 नवीन सदस्यांची नावे दाखल झाली असून 183 जणांची नावे कमी झाली आहेत. प्रत्येक महसूल मंडलनिहाय ही मोहीम राबविण्यात आली होती. 

तहसीलदार दिनेश पारगे यांच्या मार्गदर्शनाने तालुक्‍यात मंडल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही मोहीम झाली. अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील सदस्यांनाच स्वस्त धान्य दिले जाते. केसरी व शुभ्र रेशनकार्डधारकांना धान्य मिळत नाही. दरम्यान, तालुक्‍यात अनेक रेशनकार्डमधील निधन झालेली नावे, लग्न होऊन बाहेरगावी गेलेल्या मुलींची नावे तशीच होती.

याशिवाय नवीन सदस्यांची नावेही समाविष्ट झालेली नव्हती. त्यासाठी महसूल विभागाने रेशनकार्डवरील अशी नावे वगळून नवीन सदस्यांची नावे समाविष्ट करण्यासाठी ही मोहीम राबविली होती. अंत्योदय व प्राधान्य गटाच्या रेशनकार्डवरील नावे वगळली नसल्याने नवीन गरजू रेशनकार्डधारकांना धान्य मिळण्यात अडचणी येत होत्या. अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत धान्याचा कोटा निश्‍चित झाला आहे. या मर्यादेपलीकडील घटकांना धान्य देता येत नाही. त्यासाठी रेशनकार्डवरील नावे कमी-जास्त होण्याची गरज होती. 

महसूल विभागाने राबवलेल्या मोहिमेला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. तहसीलदार दिनेश पारगे यांच्या मार्गदर्शनाने हलकर्णी, दुंडगे, कडगाव, गडहिंग्लज, नेसरी, नूल, महागाव या मंडल कार्यालयांमध्ये मंडल अधिकारी, तलाठी यांनी ही कार्यवाही पार पाडली आहे. 

प्राधान्य कुटुंबात 398 नवीन कार्डे 
अंत्योदय रेशनकार्डमधील तालुक्‍यात 23 जणांची नावे कमी झाली असून 92 नावे नव्याने समाविष्ट झाली आहेत. प्राधान्य कुटुंबातील रेशनकार्डमध्ये 398 नवीन नावे समाविष्ट झाली आहेत. 115 नावे कमी झाली आहेत. केसरी कार्डमधून 38 नावे कमी झाली, तर 128 नावे दाखल झाली आहेत. शुभ्र कार्डमध्ये 7 नावे कमी होऊन 24 नवीन नावे दाखल करण्यात आली. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Reaction : ‘’मी जर पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता, तर..’’ ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा!

IND vs ENG 2nd Test: बॅट निसटली, विकेट गेली! Rishabh Pant च्या आक्रमणाला ब्रेक, मोडला ५९ वर्षांपूर्वीचा विक्रम, Viral Video

कसलं भारी! आईच्या वाढदिवसाला लेकीने आणला मालिकांचा केक; जन्मदात्रीचा आनंद गगनात मावेना, Video Viral

Ashadhi Wari: दिंडीत मोकाट जनावरांचा हल्ला; अनेकजण जखमी, चिमुकल्यांचाही समावेश

Bhor Police : ५८ पैकी २९ पोलिस कार्यरत, ५० टक्के जागा रिक्त; भोर पोलिस ठाण्याची स्थिती

SCROLL FOR NEXT