new 77 corona positive cases in kolhapur total positive count of 3420 
कोल्हापूर

ब्रेकिंग - कोल्हापूरमध्ये आज आणखी ७७ जणांना कोरोनाची बाधा...

सुनील पांडुरंग पाटील

कोल्हापूर : कोरोनाबाधितांच्या संख्येत आज सकाळीच ७७ नव्या रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे, कोरोना बाधितांचा संख्या आता 3 हजार 420 वर गेली आहे. यामध्ये, कोल्हापूर शहरातील 25, शाहुवाडी 6, राधानगरी 5, भुदरगड 1, करवीर तालुका 20, शिरोळ 1, हातकणंगले 1 पन्हाळा 4 व इतर 14 असे एकूण 77 कोरोना रुग्ण वाढले आहेत. यामध्ये कोल्हापूर शहरातील  रुग्णांचा अधिक समावेश आहे.

 कोरोनासंसर्ग टाळण्यासाठी चार दिवसांपासून लॉकडाउन सुरू आहे. त्याला चांगला प्रतिसाद आहे. तरीही बाधितांची संख्या अजूनही वाढतीच आहे. अशा स्थितीत सीपीआर रुग्णालयासह जिल्ह्यातील सहा कोविड सेंटरमधील बेडची संख्याही अपुरी पडू लागली. कोरोनाच्या व्याख्येत बसणारी लक्षणे असलेल्यांची संख्या व त्या अनुषंगाने स्वॅब तपासणीची संख्या जास्त आहे. परिणामी, येत्या काही दिवसांत आणखी बाधित आढळण्याची शक्‍यता आहे. त्यांच्यावर उपचार करावे कोठे, असा प्रश्‍न आहे. 

रुग्ण एक तास वेटिंगवर
शहरातील एका क्वारंटाईन सेंटरवर एका रुग्णाला रात्री अचानक श्‍वासोच्छ्वासाचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्याला तत्काळ रुग्णालयात नेणे गरजेचे होते. त्यासाठी प्रयत्नही सुरू झाले. विविध ठिकाणी दूरध्वनी करून मदतीचे आवाहन सुरू झाले. याबाबतची माहिती समजताच व्हाईट आर्मीचे विनायक भाट आणि जवान सर्व खबरदारीच्या साहित्यासह रुग्णवाहिका घेऊन तेथे दाखल झाले. रात्री अकराच्या सुमारास संबंधित रुग्णाला क्वारंटाईन सेंटरवरून रुग्णालयात हलविण्यात आले.

दृष्टिक्षेपात
एकूण कोरोनाग्रस्त    ३, ४२०  
एकूण कोरोनामुक्त    १, १०९   
आजअखेरचे मृत्यू    ९०
सध्या उपचार घेणारे    २, २२३ 


संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT