New Ajmer connection in Belgaum's Corona 
कोल्हापूर

बेळगावच्या कोरोनाचे 'हे' आहे नवे कनेक्शन...

सकाळवृत्तसेवा

बेळगाव - बेळगाव जिल्ह्यातील कोरोनाचे आता नवे कनेक्शन समोर आले आहे. आजवर बेळगाव जिल्ह्यात जेवढे कोरोना रुग्ण सापडले त्यांचे कनेक्शन दिल्ली येथील तबालिगी मरकज शी होते. पण रविवारी सापडलेल्या सर्व कोरोना रुग्णांचे कनेवशन राजस्थान येथील अजमेर शहराशी आहे. त्यामुळे पहिल्यांदाच बेळगाव जिल्ह्यातील कोरोनाची तबालिगी साखळी तुटली आहे.

रविवारी बेळगाव जिल्ह्यात २२ जनांचे कोरोना अहवाल पॉजिटीव्ह आले. त्या सर्वांची ट्रॅव्हल हिस्टरी अजमेर येथील आहे. लॉक डाउन काळात अजमेर येथे अडकलेल्या या सर्वांना तेथून बेळगावात आणण्यात आले होते. पण त्या सर्वांना निपाणी येथे क्वारंटाईन करून ठेवण्यात आले होते. आरोग्य विभागाच्या मते दोन दिवसांपूर्वी त्यांनी बेळगाव जिल्ह्यात प्रवेश केला आहे. राजस्थान येथे कोरोनाचा प्रभाव जास्त आहे. त्यामुळे त्यांची आरोग्य तपासनी करून त्यांचे संस्थात्मक विलगिकरण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार त्यांच्या घशातील द्राव्य घेण्यात आले होते. त्याचा अहवाल रविवारी आला त्यात तब्बल २२ जण पॉजिटीव्ह आढळले. बेळगाव जिल्ह्यात एकाच दिवशी एवढ्या मोठया संख्येने रुग्ण वाढल्याची ही पहिलीच वेळ आहे. पण सुदैवाने हे २२ जण विलगिकरण कक्षात असल्याने त्यांचा अन्य कोणाशी संपर्क आलेला नाही. शिवाय जिल्ह्यात नव्याने निर्बंधित क्षेत्र तयार करण्याची गरज नाही.

दिल्ली येथील मरकज येथे जाऊन आलेले बेळगाव जिल्ह्यात आजवर कोरोना रुग्ण म्ह्णून आढळले होते. तबलिगीमुळे जिल्ह्यात कोरोना आले असे वक्तव्य जिल्हा पालकमंत्री जगदीश शेट्टर यांनी त्यामुळेच केले होते. पण आता हे नवे अजमेर कनेक्शन समोर आले आहे. यामुळे पुन्हा बेळगाव जिल्ह्य धास्तावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhurandhar 2 ने पहिल्याच दिवशी कमावला 'इतक्या' कोटींचा गल्ला, बॉलिवूडच्या ओपनर सिनेमांचे सगळे रेकॉर्ड मोडले

Alphonso Mango Price : हापूसचा 'रुबाब' वाढला! 5 हजारांपासून 12 हजारांपर्यंत एक पेटी; सोन्याच्या दरात विकला जातोय कोकणचा राजा

Accident News : देवदर्शन ठरले अखेरचे ! भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांंचा दुर्दैवी मृत्यू

Jalna News: परतूर तालुक्यात कामगार योजनेत मनमानी; वर्ष उलटले तरीही क्लेम रखडलेले

Marathi Language : इस्रायलमध्ये मराठीचा झेंडा! इवा तळेगावकरांनी परदेशात जपली मातृभाषेची ओळख

SCROLL FOR NEXT