new app launched for fish selling with online in belgaum the new policy of department 
कोल्हापूर

खवय्यांसाठी खुशखबर ; आता मासेही मिळणार घरपोच

महेश काशीद

बेळगाव : ग्राहकांना घरपोच ताजे मासे पोचविण्याची अभिनव योजना मत्स्य खात्याने हाती घेतली आहे. ग्राहकांनी ऑनलाईन ऑर्डर दिल्यानंतर मासे घरी पोचविले जाणार आहेत. यामुळे ग्राहकांबरोबरच मत्स्योद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. ही योजना 21 नोव्हेंबरला बंगळूरमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरु केली असून पुढील महिन्यात राज्यभर राबविली जाणार आहे. 

राज्यात मत्स्याहार करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पण, विविध कारणांमुळे अनेकांना मासे खरेदीसाठी बाजारात जाता येत नाही. त्यामुळे, मासे ऑनलाईन विक्रीची योजना आखण्यात आली आहे. त्यासाठी मत्स्योद्योग खात्याने एक ऍप विकसित केले आहे. त्यावर माशांचे विविध प्रकार व दरही असतील. त्यावरुन ग्राहकांना घरात बसून आपल्या आवडीनुसार मासे मागविता येणार आहेत. ही सेवा घरपोच असल्याने ग्राहकांचा त्रास वाचणार आहे. तर मत्स्योद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांनाही आपले उत्पादन सहज विक्री करता येईल. 

योजनेमुळे राज्यातील मासे विक्री वाढणार आहे. तसेच मत्स्य उलाढालीत कर्नाटक देशात दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्थानी पोचण्याची शक्‍यता आहे. या योजनेला 21 नोव्हेंबर रोजी बंगळुरात सुरवात करण्यात आली आहे. तिथे मिळणारे यशापयश पाहून या योजनेचा संपूर्ण राज्यात विस्तार केला जाणार आहे. 

राज्यातील मत्स्य उत्पादन वाढ करण्याचीही योजना आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षित मासे विक्रीला प्राधान्य देऊन मासे विक्री व उत्पादन वाढविले जाणार आहे. माशांची मागणी पाहून उत्पादनवाढीसाठी मत्स्योद्योग करणाऱ्यांना आवश्‍यक त्या सर्व बाबी पुरविल्या जाणार आहेत. तसेच मंगळूर जिल्ह्यात मस्त्य विद्यापीठ स्थापण्याचा प्रस्ताव आहे. याशिवाय अंकोला, कारवार, उडुपी, शिमोग्यासह म्हैसूरमध्ये नवीन मत्स्य महाविद्यालय सुरु करण्याचा प्रस्ताव आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

Monsoon Update: मान्सूनचा वेग मंदावला! देशातल्या १२ राज्यांतील ३१५ जिल्ह्यांवर दुष्काळाचे भीषण सावट

Tankerman Salman Pathan : गावचा पाणी पुरवठा झाला कमी; अगरवाडगावची तहान भागवतोय ‘टँकरमॅन’ सलमान

SCROLL FOR NEXT